Tuesday, August 4, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सिद्धाराम म्हेत्रेंच्या मजेदार खेचखेचीने चर्चेत हस्यांचे फवारे ; काँग्रेसच्या आजी-माजींचा रंगला खेळ

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
26 September 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 




सोलापूर : काँग्रेसचे राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर होते दुपारी शासकीय विश्रामगृहावर त्यांच्या विभागाच्या बैठका होत्या त्या पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्ह्यातील सर्व काँग्रेस नेत्यांना चर्चेसाठी बोलावले होते याच दरम्यान अक्कलकोटचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे काही जणांसोबत बाहेर थांबून होते दरम्यान नेतेमंडळी वाढल्याने म्हेत्रे यांनी दुसरा सूट उघडण्यास सांगितला.

 त्या ठिकाणी हॉलमध्ये सर्वजण जाऊन बसले म्हेत्रे यांच्या बाजूला काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके पंढरपूरची तालुकाध्यक्ष प्रकाश तात्या पाटील हे बसले एका बाजूला अर्जुन तात्या पवार, मंगळवेढ्याचे अविनाश शिंदे, दक्षीणचे बसवराज बगले ही नेते मंडळी बसली यावेळी पत्रकारांनी शेळके सध्या तुमच्याजवळ दिसत आहे हसापुरे कुठे आहेत? असा प्रश्न केला असता शेळके जवळ आले की हसापुरे लांब पळतात आणि हसापुरे जवळ आले की शेळके लांब असे म्हणून आपल्या खेचाखेचीला सुरुवात केली.

 तसे पाहिले तर बाळासाहेब शेळके माझे जूने मित्र त्यानंतर अशोक देवकते राजशेखर शिवदारे हे मित्र… सुरेश हसापुरे आत्ता आले आहेत परंतु सर्व माझेच आहेत असे सांगितले. यावेळी बोलताना म्हेत्रे यांनी बाळासाहेब शेळके यांची चांगलीच खेचली तसे पाहिले तर आनंदराव देवकते यांचे खरे वारसदार अशोक देवकते मात्र बाळासाहेब शेळके यांनी अतिक्रमण केले असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला याचवेळी माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांचे हॉलमध्ये आगमन झाले या या अध्यक्ष आता इथं सर्व माजी होते,आता तुमची पण भर पडली तेवढ्यात पंढरपूरचे प्रकाश तात्या पाटील यांनी मात्र आता आपण माजीच राहणार आपल्याला संधी मिळणार नाही असे नाराजीने सांगितले त्यांच्या चेहऱ्यावर व बोलण्यातून नूतन जिल्हाध्यक्ष निवडीची नाराजी स्पष्ट दिसत होती.  याठिकाणी दोन-दोन प्रकाश आलेत तिसरा प्रकाश कुठे आहे असे म्हणताच शहराचे अध्यक्ष प्रकाश वाले यांची हॉलमध्ये इंट्री झाली या या तुम्ही फक्त आजी आहात आम्ही सर्व माजी आहोत असे म्हणून म्हेत्रे यांनी वाले यांची टर उडवली तेवढ्यावर गप्प न बसता म्हेत्रे यांनी प्रकाश वाले यांचे काळे केस आणि पांढऱ्या मिशीवर सुद्धा भाष्य केले पांढर्‍या मिशा ठेवणाऱ्यांचे नशिब असते जेव्हा अमिताभ बच्चन यांनी मिशी आणि दाढी पांढरी ठेवले तेव्हापासून ते मालामाल आहेत म्हणूनच प्रकाश वाले हे पांढरी मिशी ठेवतात का असे म्हणतात सर्व उपस्थितांमध्ये हस्यांचे फवारे उडाले.

जिल्हा कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी यांचे आगमन झाले त्यांना मात्र प्रकाश तात्यांनी शेजारी बसवले, खुर्ची  दिली तेव्हा लगेच पत्रकारांनी दुसरा कार्याध्यक्ष आल्यावर खुर्ची देणार का असे म्हणतात प्रकाश वाले यांनी म्हेत्रे  यांना उद्देशून नाही ते लाडके आहेत त्यांना थेट मांडीवर बसून घेतील असे म्हणून म्हेत्रे यांची खेचली. उपस्थित एका ज्येष्ठ नेत्याने म्हेत्रे यांच्या अक्कलकोट पराभवाचे चिंतन सुरू केले, तेव्हा म्हेत्रे यांनी बस्स झाले आता जिल्हा परिषदेला आपले सगळे कार्यकर्ते निवडून आणायचे असे म्हणताच समोरच्या एकाने मात्र आजही लोक तुम्हाला मानतात, तुमच्या शिवाय पर्याय नाही असे सांगितले.

दरम्यान गप्प बसलेल्या बाळासाहेब शेळके यांनी ही बोलण्याची संधी सोडली नाही, अक्कलकोट तालुक्यात म्हेत्रे साहेब एकटेच नेते आहेत असे म्हणताच बळोरगी यांना आवडले नाही मी नेता नाही का?अशी नाराजी व्यक्त केली मात्र शेळके यांनी नेते आहेत पण नेतृत्व एकच आहे साहेबाना मोठा वर्ग मानतो पण दक्षिण मध्ये साहेबांनी नेते वाढवले म्हणून गटबाजी वाढली असे सांगून आपली मनातील नकळत खदखद व्यक्त केली.

एकूणच या मजेदार चर्चेमधून दक्षिण सोलापूर तालुक्यातील गटबाजी त्यामुळे पक्षाचे झालेली अवस्था याचे मजेदार पणे चिंतन तर झालेच मात्र सत्य परिस्थिती समोर आली.

SendShareTweetSend
Previous Post

कासेगावचा सर्व बाजूनी संपर्क तुटला, मुसळधार पावसामुळे ओढे “ओव्हरफ्लो”

Next Post

वक्फ बोर्डाचे सीईओ सोलापूरात ; जमियत उलमा-ए- हिंदने केल्या या महत्त्वाच्या मागण्या

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

वक्फ बोर्डाचे सीईओ सोलापूरात ; जमियत उलमा-ए- हिंदने केल्या या महत्त्वाच्या मागण्या

ताज्या बातम्या

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026
भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

25 July 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

23 July 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026
‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !

12 July 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1994111
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group