राज्याच्या महसूल विभागाने पुणे विभागातील पदोन्नती झालेल्या पदास्थापनेच्या प्रतीक्षेत असलेल्या 20 तहसीलदारांना पदस्थापना दिल्या त्यामध्ये सोलापुरातील दक्षिण तालुक्यातील मंद्रूप अप्पर तहसीलदार पदावर राजशेखर लिंबारे यांची नियुक्ती करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल तहसीलदारपदी डी व्ही मोहाळे यांची नियुक्ती झाली आहे, तहसीलदार सर्वसाधारण पदावर अंजली कुलकर्णी यांची नियुक्ती झाली असून करमणूक कर तहसीलदार पदावर एन एच वाकसे यांना पदभार देण्यात आला आहे.
मंद्रूपच्या अप्पर तहसीलदार उज्वला सोरटे यांची सांगलीला बदली झाल्यानंतर त्या पदावर कोण येणार याची उत्सुकता सर्वाधिक होती. यापूर्वी राजशेखर लिंबारे यांनी दक्षिण तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून काम केले आहे त्यांची तालुक्यात चांगली ओळख असून सर्वसामान्य मध्ये चांगली प्रतिमा असलेला अधिकारी मंद्रूप अप्पर तहसीलदारपदी नियुक्ती झाल्याने तालुक्यातून समाधान व्यक्त होत आहे.

















