सोलापूर -उत्तर सोलापूर तालुक्यातील शहरानजीक असलेला हिप्परगा तलाव यावेळी शंभर टक्के भरल्याने या भागातील शेतकरी आनंदित झाले असून उत्तर सोलापूर तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार दिलीपराव माने यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
हिप्परगा तलाव हा हिप्परगे सह हगलुर, एकरुख, तरटगाव, बाणेगाव, भोगाव, या गावास वरदान असुन तलावावर सुमारे एक हजार शेतीपंप मोटारी आहेत. सुमारे वीस वर्षानंतर हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने या भागातील शेतकरी आनंदित झालेला आहे. आज हा आनंदी क्षण माजी आमदार दिलीपराव माने यांच्या हस्ते जलपुजन करुन साजरा केला तर यावेळी माने यांनी नौकाविहार देखील शेतकरी व नागरीका समवेत केले .
हिप्परगा तलावात पाणी कमी असताना प्रशासनाने मोटरी कनेक्शन बंद करण्याची कारवाई केली यावेळी मोटारी बंद करु नका यासाठी मी पुढे झालो.तसेच पृथ्वीराज माने युवा मंचने तलावात पाणी नसताना दिलेली विज बिल कमी विज बिल कमी करण्याचा प्रश्न हाती घेतला. सतत निसर्गामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी पावसाने चांगला दिलासा दिला आहे.शेतकरी व गावातील आपल्या कोणत्याही अडचणीत मी व माने कुंटुबीय आपणासोबत असेल. असे माने यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अशोक भिंगारे ,भिष्माचार्य सुरवसे, बाळासाहेब जाधव ,किसन भिंगारे, अजय रेवजे, राजू हाैशेट्टी ,तानाजी सुरवसे, राम सुरवसे ,विजय पाटील, किसन भिंगारे , शब्बीर शेख ,बाळासाहेब पाटील , बाळासाहेब भिंगारे, गणेश बचुटे , विरेश रेवजे, अनु उंबरे, कबीर सुरवसे ,प्रमोद कदम, पैगंबर शेख, सागर कोरे, अतिश बचुटे, श्रीनिवास भिंगारे, अमोल शिंदे, दिगंबर भोसले, दामा पाटोळे, वसंत बोराडे, मदन भालेराव, स्वप्नील वायचळ ,आकाश उंबरे आदीसह तळे हिप्परगा व परीसरातील गावाचे शेतकरी व नागरिक उपस्थित होते.


















