सोलापूर : भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली, यावेळी बुलेट ट्रेनचा मार्ग बदल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला, यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी एकीकडे देशाचे पंतप्रधान भारतीय जनता पार्टीचे आहेत त्यांचे विकासाचे धोरण पाहता सोलापूरचा मार्ग बदलला जाणार नाही असेही सांगितले.
तसेच खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी व खासदार रणजितसिंह निंबाळकर या दोन्ही नेत्यांनी याबाबत पाठपुरावा केला आहे, जिल्हाधिकाऱ्यां सोबत बैठक घेतली आहे त्यामुळे कोणताही परिणाम होणार नाही अशी ही माहिती दिली. मुख्यमंत्र्यांचे व्हायरल झालेल्या पत्रावर भाष्य करताना त्यांनी हा राष्ट्रवादीचा डाव आहे, शिवसेना संपवण्याची म्हणूनच पत्र एवढं व्हायरल झाले आहे असाही आरोप भाजपच्या देशमुख यांनी केला
यावर पत्रकारांनी हा विषय वरिष्ठ पातळीवरचा असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत झाला असताना खासदार पाठपुरावा करत असताना तुम्ही पत्रकार परिषद घेण्याची स्टंटबाजी का केली? असा थेट सवाल केला.
यावेळी पत्रकारांनीच जिल्हाध्यक्षांना धारेवर धरले तेव्हा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांना पत्रकारांच्या प्रश्नाला व्यवस्थित उत्तर देता आली नाहीत पहा पत्रकार परिषदेतला हा व्हिडिओ काय घडले



















