Sunday, May 3, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

झेडपीत सांगोल्याचे राजकारण पेटले ; काय घडले स्थायी समिती बैठकीत?का केला राष्ट्रवादीच्या बैठकीत अतुल पवार यांचा निषेध

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 October 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगोला तालुक्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. आबांच्या जाण्याने दुसरा आबा काहीसा एकटा पडला आहे, मोठा आणि शब्दाला मान असलेला नेता गेल्याने राजकारण विस्कळीत झाल्याचं बोललं जातंय. त्याचे पडसाद आता जिल्हा परिषदेत उमटू लागले आहेत. सांगोल्यातील सात सदस्यांपैकी दोन राष्ट्रवादी, तीन शेकाप आणि दोन शिवसेनेचा सदस्य आहे. सध्या सेनेचे अतुल पवार, समाज कल्याण सभापती संगीता धांडोरे, ऍड सचिन देशमुख, दादासाहेब बाबर हे चार सदस्य एका बाजूने आहेत, तर कृषी सभापती अनिल मोटे, सदस्या स्वाती कांबळे यांचा गट वेगळा आहे. सभापती अनिल मोटे यांच्या घेरडी ग्रामपंचायतची सत्ता सेनेच्या अतुल पवार यांनी आपल्या ताब्यात घेतली आहे, पवार गटाचा सरपंच आहे, त्यामुळे सभापती मोटे आणि अतुल पवार यांच्यात सध्या शीतयुद्ध सुरू आहे. 

या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत घेरडी गावात ग्रामपंचायतच्या वतीने गाळे बांधण्याचा ठरावाचा विषय होता, हा ठराव समाज कल्याण सभापती संगीता धांडोरे यांनी चिट्ठीतून अतुल पवार यांना मांडण्यासाठी दिला तो ठराव पवार यांनी वाचून दाखवला मात्र सभापती मोटे यांनी या ठरावाला डायसवरून विरोध केला, याच वेळी  राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेश पाटील यांनी मोहोळ तालुक्यातील अनगर गावातील एका विषयाला अनुमोदन दिले होते,

 तेव्हा घेरडीच्या ठरावाला मोटे यांनी अनुमोदन द्यावे अशी अपेक्षा अतुल पवारांनी व्यक्त केली, मात्र मोटेनी नकार दिला, तेव्हा मोटे-पवार यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली, अरेतुरे होऊन तू काय तालुक्याचा ठेका घेतलाय का? ए अन्या.., वगैरे..,असे असंसदीय शब्द सभेत दोघांच्या तोंडून बाहेर पडले. एकमेकांची माप काढण्यापर्यंत विषय गेला, वाद इतका झाला की एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत मजल गेली, अध्यक्ष व उपाध्यक्ष दोघे नव्हते म्हणे, शेवटी सर्वांनी मिळून वाद थांबवला मात्र आपला अपमान झाला समजून   पवार वर कोण कारवाई करत नाही म्हणून मोटे सभा सोडून बाहेर पडले अशी माहिती मिळाली. मागील काही दिवसांपासून मोटे हे सभापती असतानाही डायस वरूनच विरोध करताना दिसत आहेत.

त्यानंतर या घटनेचा विषय राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत झाला तेव्हा अतुल पवार यांचा निषेध नोंदवण्यात आल्याचे समजले, आता मोटे हे पवारांच सगळंच बाहेर काढण्याची भाषा करत आहेत, तर अतुल पवारांनी मी कुठल्याही आव्हानाला तयार असल्याचं सांगितलं आहे. मुळात अतुल पवार यांनी पुढील झेडपी निवडणूक ही स्वतःच्या गटा ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचा हक्काचा असलेल्या जवळा या मतदारसंघातून लढवायचे नियोजन केले आहे. तशी उघड मोर्चेबांधणी सुरू केली आहे, झेडपी मध्ये सुरू असलेल्या पवार-मोटे वादाचे खरे कारण जवळा गटाची मोर्चेबांधणी असल्याचे बोलले जाते.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग : पोलीस अटकेत असलेल्या पारधी समाजातील तरुणाचा सिव्हीलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू ; पत्नीसह मुलांचा टाहो

Next Post

भाजप जिल्हाध्यक्षांच्या ‘प्रेस’ला पत्रकार आक्रमक ; श्रीकांत देशमुखांना उत्तरे देता आली नाहीत

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

भाजप जिल्हाध्यक्षांच्या 'प्रेस'ला पत्रकार आक्रमक ; श्रीकांत देशमुखांना उत्तरे देता आली नाहीत

ताज्या बातम्या

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979010
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group