सोलापूरच्या जिल्हा नियोजन समितीवर गुरुवारी 20 नव्या सदस्यांची नियुक्ती झाली त्यामध्ये आमदार मधून 2, नियोजन समितीचे ज्ञान असलेले 4 आणि निमंत्रित म्हणून 14 अशा वीस सदस्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये धनगर समाजातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगावचे बाळासाहेब पाटील उर्फ बंडगर मामा यांची सुद्धा निवड झाली आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे झाल्यापासून बंडगर मामा हे चांगलेच सक्रिय झाले होते, त्यांचा सर्वाधिक वावर दक्षिण सोलापूर तालुक्यात दिसून येतोय. त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ स्मारक समितीवर घेण्यात आले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदीवरील बंधाऱ्याचा प्रश्न, पाणी प्रश्न, शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न असे अनेक विषयांवर बंडगर मामा काम करत आहेत. शेतकरी, ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांमध्ये मिक्स होणारा नेता म्हणून मामांची ओळख आहे. निश्चितच भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसला दक्षिण मध्ये बंडगर मामांमुळे फायदा होण्याची शक्यता आहे.
जिल्हा नियोजन समितीमध्ये आता समितीचे अध्यक्ष पालकमंत्री भरणे मामा करमाळयाचे आमदार संजय मामा आणि आता तिसरा मामा म्हणून बाळासाहेब बंडगर मामा हे तिघेही दिसणार आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची मामागिरी यामुळे जोरात असल्याचे चित्र आहे.

















