काँग्रेस पक्षाचे माजी महापौर, माजी अध्यक्ष, तब्बल 7 वेळा नगरसेवक राहिलेले मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नेते यु एन बेरिया यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची शासकीय विश्रामगृहात भेट घेतली. शुक्रवारी दुपारी महेश कोठे यांनी काँग्रेसला दोन मोठे धक्के दिले होते, लगेच सायंकाळी आणखी एक मोठा धक्का बसला आहे तो बेरिया यांच्या रूपाने. बेरिया यांची भेट घालून देताना सुधीर खरटमल, महेश कोठे उपस्थित होते,
मागील अनेक वर्षांपासून बेरिया हे काँग्रेस च्या मनामनात व घराघरात दिसत नव्हते, आमदार प्रणिती शिंदे यांचे बेरिया यांच्या सोबत जमत नसल्याची चर्चा ऐकण्यास मिळत होती, ते काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाला दिसत नव्हते, आंदोलनात सहभागी नव्हते, काँग्रेस भवनात सुद्धा त्यांनी येणे जाणे बंद केले होते. काँग्रेस पक्षाने दोन वेळा त्यांना तीन वेळा स्वीकृत नगरसेवक केले, महापौर केले, सभागृह नेता केले, बरेच वर्ष ते शहराचे अध्यक्ष होते. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला जोरदार धक्के मानले जात आहेत.

















