Sunday, May 3, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर मयत शेतकरी कुटुंबियांच्या भेटीला ; शासन स्तरावरून सर्वतोपरी मदत करणार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 October 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दि.९: भोगावती नदीच्या बंधाऱ्याच्या पाण्याचा अंदाज न आल्याने देगावच्या विनायक आतकरे या शेतकऱ्याचा पुराच्या पाण्याने वाहून जाऊन मृत्यू झाला होता. ही घटना दुर्दैवी असून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शासन स्तरावरून सर्वतोपरी मदत दिली जाईल, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.

शंभरकर यांनी मयत शेतकऱ्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी आमदार यशवंत माने, जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील, पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील, तहसीलदार प्रशांत बेडसे-पाटील उपस्थित होते.

शंभरकर यांनी सांगितले की, मयत शेतकऱ्याच्या कुटुंबाला नैसर्गिक आपत्तीमधून जास्तीत जास्त मदत देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अशा घटना टाळण्यासाठी लघू पाटबंधारे विभागाने लक्ष द्यावे.

बंधाऱ्यांची पाहणी 

दरम्यान,  शंभरकर यांनी भोगावती नदीवरील बंधाऱ्याला भेट देवून पाहणी केली. शिवाय वाहून गेलेल्या शेतीची पाहणी करून संबंधितांना योग्य त्या सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी नायब तहसीलदार भालचंद्र यादव, सरपंच अण्णा भिमराव घोडके, उपसरपंच अमर आतकरे, लघू पाटबंधाऱ्याचे उपअभियंता कुलकर्णी, मंडळ अधिकारी  पांढरे उपस्थित होते.

मिशन कवचकुंडल पूर्ण करा 

श्री शंभरकर यांनी देगाव येथील आरोग्य उपकेंद्राला भेट देवून कोविड लसीकरणाची पाहणी केली. आज या उपकेंद्रावर १७० लसीकरण झाले. मिशन कवचकुंडल पूर्ण करण्याच्या सूचना देऊन लसीबाबतच्या ग्रामस्थांच्या शंका दूर केल्या. येत्या चार-पाच दिवसात १०० टक्के लसीकरण करण्याचा मनोदय ग्रामस्थांनी व्यक्त केला. यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी श्वेता पवार, आरोग्यसेविका उर्मिला आतकरे, आरोग्यसेवक प्रमोद घोडके, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका उपस्थित होते.

नरखेडमध्ये मतदान केंद्रांना भेटी

देगाव दौऱ्यावर असताना श्री शंभरकर यांनी नरखेडमधील तीन ठिकाणच्या मतदान केंद्रांची पाहणी केली. बूथ स्तर अधिकाऱ्यांना (बीएलओ) जास्तीत जास्त मतदान नोंदणी करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

SendShareTweetSend
Previous Post

एमआयएम तौफिक शेख यांच्यावर कारवाई करण्याची “डेरिंग” करणार का?

Next Post

दक्षिण तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू ; परिस्थिती पाहून कर्मचाऱ्यांचे डोळे पानावले

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

दक्षिण तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू ; परिस्थिती पाहून कर्मचाऱ्यांचे डोळे पानावले

ताज्या बातम्या

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979014
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group