सोलापूर : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल माजी महापौर नलिनी चंदेले या दोन्ही नेत्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीकाँग्रेस पक्षात प्रवेश केला, त्याचबरोबर माजी महापौर यूएन एरिया यांनीही शरद पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाण्याचे संकेत दिले आहेत.
या राजकीय घडामोडीनंतर माजी महापौर तथा शहर कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी यांची प्रतिक्रिया घेतली असता मागील काही वर्षापासून सुधीर खरटमल आणि यु एन बेरीया हे काँग्रेसमध्ये होतेच कुठे? पक्षाने एवढे मोठे केले, त्यांना सन्मान दिला हे ते विसरले असतील, त्यांचा कोणताही फायदा काँग्रेसला मागील काही निवडणुकामध्ये झाला नाही या शब्दात हेमगड्डी यांनी आपली प्रतिक्रिया दिली….


















