सोलापूर : सध्या अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे व कृषी सभापती अनिल मोटे यांच्यात टक्केवारी वरून वाद सुरू आहे. पदवीधर मतदार संघाच्या आमदारांच्या फोटोवरून जिल्हा परिषदेत गोंधळ झाला, त्यातच राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष काका साठे यांची भाषा प्रशासनाच्या विरोधात सत्तेच्या रुबाबाची दिसून आली, याच पार्श्वभूमीवर सोमवारी सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख आले होते,
यावेळी पत्रकारांनी टक्केवारी विषय तसेच आमदार अरुण लाड यांचा विषय भाजप जिल्हाध्यक्ष देशमुख यांच्यासमोर छेडला असता काका साठे हे जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते आहेत एकीकडे विरोधी पक्ष नेता दुसरीकडे त्यांच्या पक्षाचा सभापती सत्तेतला. हे राज्यातील दुर्मिळच उदाहरण आहे, काका साठे म्हणजे स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पहायचं वाकून असं कायमच दिसून आलं आहे
त्यांचा सभापती राष्ट्रवादीचा आहे तो सत्तेतला आणि काका विरोधी पक्षनेते कसे? केवळ स्वतःला चहापाणी भागावे आणि आजूबाजूला कर्मचारी असावे म्हणून विरोधी पक्षनेत्याची उठाठेव आहे. जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर आमदार अरुण लाड यांच्या फोटोवरून जो वाद झाला तो इतका मोठा नव्हता जेव्हा राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द केल्या त्यात पदवीधर सुद्धा होते तेव्हा अरुण लाड यांनी सरकारच्या विरोधात भूमिका का घेतले नाही. त्यामुळे काका साठे यांना नैतिक अधिकार नाही असे चिमटे देशमुख यांनी काढले. पहा काय म्हणाले श्रीकांत देशमुख


















