सोलापूर : काँग्रेस पक्षाचे सुधीर खरटमल, नलिनी चंदेले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला, त्यानंतर माजी महापौर यु एन बेरिया यांनी ही शरद पवार यांची भेट घेतली, या राजकिय घडामोडी नंतर काँग्रेस भवनात सोमवारी विचारमंथन झाले, पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक दिसून आले, आमदार प्रणिती शिंदे समोर अनेकांनी जोरात भाषणे केली, नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी ही जोरात भाषण ठोकले, गेले ते गेले चिंता करू नका , सोलापूरला काँग्रेस शिवाय पर्याय नाही, आता लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याची गरज आहे, आपला शत्रू भाजप खूप मोठा आहे त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे. आम्ही पैसे देतो भाजपमध्ये या असे ते सांगत आहेत, मला ऑफर आली होती असे बाबा म्हणाले…..पहा मिस्त्री यांचे भाषण


















