सोलापूर : काँग्रेस भावनांमध्ये आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पदाधिकार्यांची बैठक झाली त्या बैठकीवेळी बोलताना काँग्रेसचे शहर युवक अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे यांनी सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस हाच आपला सर्वात मोठा शत्रू आहे त्यांच्या पक्षातील नाराजांना शोधून राष्ट्रवादी फोडा असे जोरदार भाषण आमदार ताई यांच्यासमोर केले होते.
त्या भाषणाची सोलापुरात सर्वत्र सोशल मीडियावर चर्चा असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान यांनी त्यांना उत्तर दिले काँग्रेसची भाकरी कुठे करपतेय याचा पहिला शोध घ्या, पक्षाला गळती का लागत आहे याचा विचार करा, राष्ट्रवादी काँग्रेस फोडणे एवढं सोपं नाही, पहिल्यांदा तुमचा पक्ष का फुटतोय याचे चिंतन करा या शब्दात बागवान यांनी करगुळे यांच्यावर तोफ डागली


















