सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य शीतलदेवी मोहिते-पाटील स्वरुपाराणी मोहिते पाटील सुनंदा फुले मंगल वाघमोडे अरुण तोडकर गणेश पाटील या सहा सदस्यांनी पक्षाचा आदेश डावलून विरोधात मतदान केले होते. त्यांचे सदस्य पद रद्द करण्याची सुनावणी जिल्हाधिकार्यांना समोर सुरू आहे हे प्रकरण विभागीय आयुक्त, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन आलेले आहे. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने या मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी निकाल द्यावा असे आदेश केले होते. या प्रकरणात मोहिते-पाटील गटाने तक्रारदार काका साठे यांनी याचिका दाखल करताना जे कागदपत्रे सादर केले नाहीत,पुरावे नाहीत त्यावर पूर्ण चौकशी न करता प्राथमिक मुद्द्यावरच पिटीशन डिसमिस करावा अशा मागणीचा मोहिते पाटील गटाचा अर्ज नामंजूर करण्यात आला होता.
दरम्यान मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये मोहिते-पाटील गटाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना नवीन अर्ज दिला यामध्ये तक्रारदार काका साठे हे साक्षीदार म्हणून समोर येत नाहीत तर आता साक्षीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना बोलवावे. हा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांनी दाखल करून घेतला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी बुधवार 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे. याबाबत ऍड दत्तात्रय घोडके, ऍड अभिजीत कुलकर्णी यांनी अधिक माहिती दिली


















