सोलापूर : महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे गुरुवारी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येऊन गेले, सकाळी विमानाने ते विमानतळावर आले यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, जिल्हा प्रमुख गणेश वानकर, जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे या शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शहरप्रमुख तथा नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना सोलापूरच्या समांतर जलवाहिनीचा विषय प्रलंबित आहे तो लवकरात लवकर पूर्ण व्हावा त्यामुळे शहराला सोयीस्कर पाणीपुरवठा होईल त्याचबरोबर उजनी धरण सध्या शंभर टक्के पेक्षा जास्त भरले आहे.
असे असताना शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत आहे, चार ते पाच दिवसाआड पाणी मिळते, सोलापूरकरांना पाणी नियमित व वेळेवर मिळावे यासाठी महापालिका प्रशासनाची बैठक लावावी अशी मागणी केली. मंत्री पाटील यांनी त्वरित आपले खाजगी सचिव अनिल पाटील यांना येत्या आठ दिवसांत मंत्रालयात बैठक लावण्याच्या सूचना केल्या.

















