सोलापूर – कॉ.गोदुताई परूळेकर वसाहत कुंभारी येथील नागरिक व गोदुताई गृहनिर्माण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वसाहतीतील अंतर्गत ड्रेनिज, पाणी,ग्राम मार्ग क्रं 18 व 19 आणि स्वतंत्र ग्रामपंचायत या बाबत शासन निर्णय व कार्यवाहीचे आदेश जारी झाल्याचे औचित्य साधून कॉ.नरसय्या आडम मास्तर यांचा स्थानिक सामाजिक संस्था,नागरिक,तरुण मंडळ,गणेशोत्सव व नवरात्रोत्सव उत्सव समिती,देवस्थान, मस्जिद कमिटी,रिक्षा चालक संघटना मार्फत युवकांची मोटार सायकल रॅली भव्य नागरी सत्कार समारंभ उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला.
यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव ऍड.एम.एच.शेख,नगरसेविका कामिनी आडम,रे नगर फेडरेशन अध्यक्ष नलिनी कलबुर्गी, रे नगर सचिव युसूफ शेख मेजर, गोदुताई परूळेकर चेअरमन फातिमा बेग, शकुंतला पाणीभाते आदी मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे व्यवस्थापक विल्यम ससाणे,वसीम मुल्ला,युवा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी,बापू साबळे,हसन शेख, आप्पाशा चांगले, रफिक काझी, भीम तरुण मंडळ कुंभारी, ललितांबादेवी,अन्नपूर्णा देवी,वैष्णवीदेवी, नवरात्रोत्सव मंडळ, ओंकारेश्वर गणेशोत्सव मंडळ,सिद्धिविनायक गणेशोत्सव मंडळ, मातृभूमी तरुण मंडळ, जिब्राईल मस्जिद कमिटी,नुराणी मस्जिद,जय मार्कंडेय अण्णा गणपती,एस.पॉईंट मित्र मंडळ एस पॉईंट,क्रांती चौक रिक्षा स्टॉप आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अनिल वासम यांनी केले.
















