सोलापूर (प्रतिनिधी) राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नामदार छगन भुजबळ यांचा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रात मोठा उत्साहाने साजरा झाला. सोलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष विद्याताई लोलगे यांनी सामाजिक उपक्रमाने नामदार छगन भुजबळ यांचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त शहरातील शिवभोजन केंद्रावर गोरगरिबांना मिठाईचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष तथा नगरसेविका सुनिता रोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वसीमताई शेख, राजश्री कांबळे, सुनंदा साळुंखे, अनिल भिंगारे, बापू सरवदे, चंद्रकांत तमशेट्टी, ज्ञानेश्वर जन्मले यांची उपस्थिती होती.
विद्या लोलगे म्हणाल्या, महाविकास आघाडी सरकार मध्ये छगन भुजबळ हे बहुनजनांचे नेतृत्व करतात. यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांच्याकडून असेच जनतेची सेवा व्हावी, हीच ग्रामदैवत श्री सिद्धारामेश्वर चरणी प्रार्थना.
सुनीता रोटे यांनीही छगन भुजबळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली.

















