सोलापूर : विजापूर रोडवरील सोरेगाव इथल्या राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10 या ठिकाणी विजयादशमी सणाचे औचित्य साधून गट मुख्यालयात असलेल्या कॉर्टर गार्ड येथे समादेशक विजयकुमार चव्हाण यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले तसेच आधुधिक शाळा, मल्टी जीम, व्यायामशाळा, मोटार परीवहन विभागातील वर्क शॉप, स्पेअर पार्ट विभाग व शासकीय वाहनांची पूजा करण्यात आली.
यावेळी गटमुख्यालयात उपस्थित सर्व पोलीस अधिकारी, पोलीस अमलदार व त्यांच्या कुटुंबीयांना दसरा सणानिमित्त शुभेच्छा दिल्या व शिस्तीबाबत मार्गदर्शन केले. समादेशक कार्यालयात आयोजीत दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आली. समादेशक चव्हाण त्यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन झाले व डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी केलेल्या कार्याचा सन्मान करून त्यांनी केलेले कार्य हे जनतेच्या स्मरणात कायम राहावे व तशा पध्दतीने अनुकरण कराव असा संदेश चव्हाण यांनी दिला.
यावेळी गटातील अनिल कांबळे-सहायक समादेशक, राजपुत पोलीस निरीक्षक, बेगडे-पोलीस निरीक्षक, निबांळकर-पोलीस निरीक्षक, कुधार-पोउपनि, टिंगरे-पोउपनि, सावंत-पोउपनि, सर्व पोलीस अंमलदार व वर्ग-४ कर्मचारी उपस्थित होते.

















