सोलापूर : एमआयडीसी भागातील विठ्ठल नगर इथं राहणारी आरती रवींद्र नोरा वय 18 वर्ष ही विजयादशमी सणाच्या दिवशी सकाळी पावणेअकराच्या सुमारास किराणा दुकानाला गेली ती परत आलीच नाही म्हणून तिचे काका अंबादास दत्तात्रय नोरा राहणार निलम नगर यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.
त्याचबरोबर दिनांक 13 ऑक्टोबर 2021 रोजी नीलम नगर परिसरातील माळीनगर नेताजी शाळेजवळ राहणाऱ्या अंबिका निरंजन वलाल वय 47 वर्ष ही विवाहित महिला सायंकाळी सात वाजता घरातून निघून गेली ती परत आली नाही म्हणून तिचे पती निरंजन वलाल यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे याप्रकरणी पोलिसांनी बेपत्ता झालेली तरुणी आणि विवाहिता यांच्याबाबत फोटोसह प्रसिद्धी देत नागरिकांना आवाहन केले आहे.

















