सोलापूर : माढा तालुका विधी सेवा समिती व माढा तालुका वकील संघ यांचे संयुक्त विद्यमाने भारतभर जागरूकता अभियान राबवण्यात येते त्या अंतर्गत मौजे रांझणी ता.माढा येथे लोकन्यायालय आयोजित केले होते,त्यावेळी न्यायाधीश एम एस काझी हे उपस्थित होते त्यांचा सत्कार जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आला व सर्व मान्यवरांचा सत्कार करून परिसरातील लोकांचे तंटे आपआपसात मिटवण्यात आले.यावेळी पंचक्रोशीतील वादी प्रतिवादी उपस्थित होते.
तसेच न्यायाधीश काझी यांनी सर्व उपस्थित लोकांना कायदे विषयक मार्गदर्शन केले व फिरते न्यायालया विषय महत्व सांगितले,कोणावर ही अन्याय न होता खटले सोडवण्याविषयी त्यांनी सांगितले.
यावेळी संजय पाटील, कानडे ,भादुले, सचिन झेंडे,रणजित पाटील,आदि मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमास टेम्भुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमासे , कुंभार , adv.भादुले, adv संतोष कानडे,जहागीर, सुनील धोत्रे, निलेश भोसले, रणजित पाटील, माने,भांगे तसेच पोलीस स्टेशन व कोर्टातील अधिकारी उपस्थित होते,
सरपंच सोनाली माने, संगीता पाटोळे, रोहित गायकवाड,अक्षय पाटील,नेताजी चमरे,भारत मस्के,महादेव जाधव,भिवाजी माने,पांडुरंग माने,डॉ विनोद चव्हाण,नितीन मस्के,हिरा शिद,अंकुश जाधव,बबन चव्हाण,विजय सरवदे, प्रशांत पाटील,मल्हारी गवळी,हरिदास मोहिते,विजय पतूले,वरूण पाटोळे यांची ही उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी एल एम शेख यांनी केले व आभार कुंभार यांनी मानले.
















