Saturday, March 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकिंग : उत्तर” सभापती अविश्वास ठराव सभाच बेकायदेशीर ; रजनी भडकुंबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 October 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 


सोलापूर : उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या सभापती रजनी भडकुंबे यांच्यावर अविश्वास ठराव आणावा म्हणून तालुक्यातील भाजपच्या संध्याराणी पवार, काँग्रेसचे हरिदास शिंदे, राष्ट्रवादीचे जितेंद्र शीलवंत या तिघांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी हेमंत निकम यांची नियुक्ती करून सभा काढण्याच्या सूचना केल्या त्यानुसार निकम यांनी 22 नोव्हेंबर ही तारीख काढली आहे. या अविश्वास ठराव सभेवरून सध्या उत्तर सोलापूर तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

एकीकडे दिलीप माने हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असतानाच खुद्द राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांनी त्यांच्याच विरोधात सभापती वर अविश्वास ठराव आणण्याचे नियोजन भारतीय जनता पार्टीच्या सदस्याला हाताशी धरून केले. जरी काका साठे हे सांगत नसले तरी त्यांच्या मनात दिलीप माने यांच्या बद्दलचा रोष दिसून येतो आज पर्यंत उत्तरच्या  सभापतीवर अविश्वास ठराव एकदाही आला नाही,  त्यामुळे अविश्वास ठरावाचा विषय कधीच नाही असे काका साठे वारंवार पत्रकारांना सांगत होते मात्र मागील काही महिन्यामध्ये बाजार समिती सभापती निवडीच्या कारणावरून दिलीप माने आणि काका साठे यांच्या दुरावा निर्माण झाला,  काका साठे यांनी जाणीवपूर्वक सभापतींच्या निवडी मधून काढता पाय घेतल्याने दिलीप माने यांनी तालुक्यात काकाच्या विरोधकांच्या भेटीगाठी घेत आहेत. याचाच रोष मनात धरून काका साठे व जितेंद्र साठे यांनी हा अविश्वास ठराव आणल्याची चर्चा उत्तर तालुक्यात रंगली आहे.

 दरम्यान सभापती रजनी भडकुंबे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना ही अविश्वास ठराव सभा रद्द करावी ती कायद्याला धरून नाही असे पत्र दिले आहे या पत्रावर आता जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  दरम्यान सभापती भडकुंबे यांनी या पत्रामध्ये कोणते मुद्दे मांडले आहेत ते पहा

१.दिनांक ०८/१०/२०११ रोजी हरिदास नागनाथ शिंदे, जितेंद्र शिलवंत व  सध्याराणी इंद्रजित पवार यांनी जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिनियम १९६१ चे कलम ७२ अन्वये अविश्वास ठरवाबाबत मागणीपत्र केले म्हणून दिनांक २२/१०/२०२१ रोजी पंचायत समिती उत्तर सोलापूर  येथे विशेष सभा आयोजित केली आहे. ती स्थिगीत करणे, रद्द करणे जरूरी आहे.


२. वास्तविक पाहता उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या सभापती पदाचा कार्यकाळ कमी राहीलेला असल्याने कायद्यानुसार सदर अविश्वास ठराव आणता येत नाही. या कारणास्तव सदरची सभा बेकायदेशीर आहे, म्हणून ती रद्द करावी.


३ सदर सभा ही महाराष्ट्र जिल्हा पंचायत समिती अधिनियमातील तरतुदी अन्वये नसल्याने सदरची सभा रद्द करण्यात यावी. अविश्वासाची मागणी नोटीस विहित नमुन्यात नसून सभा बोलण्याची विनंती करण्यात आलेली नाही. तसेच सभेच्या नोटीसमध्ये “नियोजित ठरावाची प्रत सोबत देण्यात येत आहे” असे कथन नाही. तसेच मा.जिल्हाधिकारी यांनी अध्यासी अधिकाऱ्यांना प्राधिकृत आदेश सदर्भ नंबर नमूद नाही.


४. सभापती किंवा उपसभापती प्राधिकाऱ्या विरुद्ध अविश्वासाच्या ठरावासबंधी घालून दिलेल्या नियमानुसार सदर अविश्वास ठरावाची नोटीस विहीत नमुन्यात नसल्याने त्या आधारे सदर सभा बोलवता येत नाही. म्हणून सभा रद्द करावी.


५.सदरची नोटीस ही अविश्वासाच्या नियम १९६२ नियम 3 अन्वये दिलेली नसल्याने  सदरची सभा नियमानुसार घेता येणार नाही, म्हणून ती रद्द करणे आवश्यक न्यायाचं आहे.


६. अर्जात नमूद कारणास्तव व कायदेशीर तरतुदी विचारात घेता दिनांक २२/१०/२०११ रोजी उत्तर सोलापूर पंचायत समिती सभापती विरुद्ध म्हणजे अर्जदाराविरुद्ध ठेवण्यात आलेली सभा रद्द करण्याची कृपा करावी.


१७. सदर सभा रद्द करणे-घेणे याबाबचे निर्णय ठरविण्याचा अधिकार हा जिल्हाधिकारी यांना कायदयाने आहे.

SendShareTweetSend
Previous Post

अरे व्वा…, किरीट सोमय्यानी भाजपचाच घोटाळा बाहेर काढला..,या घोटाळ्याचा पाठपुरावा कराच साहेब

Next Post

ब्रेकींग : बनावट डिझेल बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश ;पालघर इथं छापा टाकून 17 कोटीचा मुद्देमाल जप्त

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग : बनावट डिझेल बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश ;पालघर इथं छापा टाकून 17 कोटीचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971586
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group