सोलापूर : माजी आमदार दिलीप माने हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते कॉंग्रेस मध्ये असले तरी त्यांची अटॅचमेंट उपमुख्यमंत्री “अजितदादा” यांच्याशी कायम राहिली आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांनी दिलीप माने यांच्या निवासस्थानी मुक्काम केला होता त्यांच्या बँक शाखा उद्घाटन कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती.
उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या सभापती रजनी भडकुंबे यांच्यावर अविश्वास ठराव अर्ज दाखल झाला असून त्याची विशेष सभा 22 ऑक्टोबर रोजी आहे. दिलीप माने यांचा एक पंचायत समिती सदस्य फुटून भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना जाऊन मिळाला आहे हा विषय सभापती रजनी भडकुंबे यांच्यापेक्षा दिलीप माने मालकांसाठी प्रेस्टिजचा विषय बनला आहे. दरम्यान गप्प बसतील ते दिलीप माने कसले त्यांनी आपल्या हालचाली सुरू ठेवल्या आहेत याच पार्श्वभूमीवर बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांनी भेट घेतली या भेटीत दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध विकास कामांना निधी देण्याची मागणी करण्यात आले आहे मात्र उत्तर सभापती अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे .
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे हे ऐकायला तयार नाहीत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सोलापूरात असतानाच जिल्हाध्यक्ष काका साठे यांचे चिरंजीव जितेंद्र साठे यांनी भारतीय जनता पार्टीला सोबत घेऊन जिल्हाधिकार्यांना अविश्वास ठरावाचा अर्ज दिला होता. काका साठे यांना सांगितल्याशिवाय जितेंद्र साठे कोणतेही पाऊल उचलणार नाहीत हे जगजाहीर आहे त्यामुळे या अविश्वास ठरावामागे काका यांचाच हात असल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे.
सोमवारी सभापती रजनी भडकुंबे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ठरावा विरोधात अर्ज देऊन अविश्वास ठराव बेकायदेशीर असल्याचे सांगत काही मुद्दे प्रशासनासमोर आणून दिले. त्यामुळे प्रांत अधिकारी हेमंत निकम यांच्या कार्यालयातून पळापळ सुरू झाली एका नोटिशीचे पत्र देण्यासाठी धावपळ झाली, 18 तारखेच्या दिलेल्या नोटिशीवर 14 तारीख होती त्यावरून प्रांत कार्यालय तांत्रिक अडचणीत सापडल्याचे या पळापळी वरून स्पष्ट होतं. आता येणाऱ्या 22 ऑक्टोबर रोजी सभेचे पीठासीन अधिकारी हेमंत निकम हे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

















