सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीत एडवोकेट नीलेश ठोकडे व एडवोकेट सुरेश बापू गायकवाड यांच्या पॅनलमध्ये सरळ लढत होणार आहे. सहसचिव पदासाठी केवळ ऍड अलका मोरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्या बिनविरोध झाल्यात जमा आहेत.
सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक जाहीर झाली असून बुधवारी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता प्राप्त झालेल्या माहितीनुसार एडवोकेट सुरेश गायकवाड यांचे परिवर्तन पॅनल तर ॲडव्होकेट निलेश रोकडे यांचे विधी विकास पॅनल मध्ये सामना होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. ॲडव्होकेट निलेश ठोकडे यांच्या पॅनेलमधून उपाध्यक्ष पदासाठी ॲडव्होकेट निलेश जोशी, सचिव पदासाठी अडवोकेट मनोज पामुल, खजिनदार पदासाठी चंद्रसेन गायकवाड हे निवडणूक लढवत आहेत. एडवोकेट सुरेश बापू गायकवाड प्रणित परिवर्तन पॅनल मध्ये उपाध्यक्षपदा साठी ऍडव्होकेट असीम बांगी, सचिव पदासाठी अविनाश बिराजदार,खजिनदार पदासाठी दयानंद माळी हे निवडणूक रिंगणात आहेत.
याशिवाय एडवोकेट आनंद काळे व नागनाथ बिराजदार यांनी उपाध्यक्षपदासाठी स्वतंत्ररित्या निवडणूक अर्ज दाखल केलाय. गायकवाड आणि ठोकडे पॅनल तयार झाले असून आता दोन्ही पॅनल ने प्रचारात सुरुवात केली आहे. परिवर्तन पॅनेल तसेच विधी विकास पॅनलने कोर्ट परिसरातील सर्व वकील बांधवांच्या भेटीगाठी घेऊन प्रचार सुरू केला आहे. मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून ऍड बसवराज सलगर हे असून सहाय्यक निवडणूक अधिकारी उपाध्यक्ष एडवोकेट गणेश पवार, सचिव एडवोकेट अभिषेक गुंड, सहसचिव वैशाली बनसोडे, खजिनदार हेमंतकुमार साका हे काम पहात आहेत.
दरम्यान निवडणूक अधिकारी एडवोकेट बसवराज सलगर यांनी अधिक माहिती दिली
विधी विकास पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार ॲडव्होकेट निलेश ठोकडे यांनी सहसचिव वैशाली मोरे बिनविरोध झाल्याने पॅनलसाठी शुभ संकेत असल्याचं सांगितलं.
तर एडवोकेट वैशाली मोरे यांनी बार असोसिएशनच्या माध्यमातून महिला वकिलांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्याची ग्वाही दिली

















