सोलापूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमधील कृष्णा पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी बुधवारी काँग्रेसमध्ये जाहिर प्रवेश केला.
सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील तुळजापूर नाका येथे सायंकाळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी काँग्रेस सेवादल यंग बिग्रेडमध्ये प्रवेश केला. यावेळी काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे कृष्णा पवार यांच्यासह अविनाश अलकुंटे, अजय चौगुले, गोटू कांबळे, किरण घोडके, विजय चौगुले, प्रवीण मोटे, महेश पवार, सोनू जटीथोर, गणेश वीटकर, अभिषेक कोळी, राजू कापरे आदींनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी सुदीप चाकोते यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. आगामी निवडणूकीत काँग्रेस पक्ष बळकटीचे काम जोमाने करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी शहराध्यक्ष वाले यांनीही प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्तविक सुरज कोरे यांनी केले. यावेळी सुदीप चाकोते यांच्या हस्ते अनिल अलकुंटे यांचा तर प्रकाश वाले यांच्या हस्ते गोवर्धन घोडके यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचे आभार अजय पिटाळकर यांनी मानले.

















