सोलापूर : “महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सोमवारपासून लसीकरण होणार आहे अशी माहिती डॉक्टर बसवराज लोहारे यांनी दिली”
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त पी. शिवशंकर यांच्या निर्देशानुसार मिशन युवा स्वास्थ covid-19 लसीकरण मोहीम 25 ऑक्टोंबर 20 नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये शहरात राबविण्यात येणार आहे अठरा वर्षाच्या पुढील व्यक्तींचे लसीकरण केले जात असून या लसीकरण मोहीम मध्ये जास्तीत जास्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा असे आवाहन मनपाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर बसवराज लोहारे यांनी केले आहे या मोहिमेची सुरूवात 25 ऑक्टोंबर रोजी सोलापूर विद्यापीठ येथून करण्यात येणार आहे सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली आहे.
















