Monday, May 4, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

धर्मराज काडादी यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे हट्ट ; मला निवडणूक अधिकारी म्हणून हाच अधिकारी पाहिजे

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
23 October 2021
in solapur
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जुना आणि मोठा समजला जाणारा श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. हा कारखाना सध्या मल्टीस्टेट दर्जाचा झालेला आहे त्यामुळे कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जिल्हा उपनिबंधक किंवा जिल्हाधिकारी देतील तो अधिकारी हा निवडणूक निर्णय अधिकारी असतो कारखान्याला निवडणूक घेताना कोणता अधिकारी पाहिजे हा मागण्याचा पर्याय  कारखान्याकडे असल्याची माहिती आहे.

सध्या श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना बेकायदेशीररीत्या बांधलेल्या चिमणी मुळे चांगलाच चर्चेचा विषय झालेला आहे. या आडून कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या ही अडचणी मागील काही वर्षांपासून प्रचंड वाढल्या आहेत शासन दरबारी पळापळ उच्च न्यायालयात पळापळ करून ते दमले आहेत. बेकायदेशीर चिमणी पाडण्याचे आदेश न्यायालयाने देऊनही ती चिमणी पाडली जात नाही. 

आता लवकरच कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक होणार आहे काडादी यांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हा निबंधक  हे नको असल्याचे समजते. त्यामुळे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेतल्याची माहिती असून त्यांना कारखान्याच्या निवडणुकीत निवडणूक अधिकारी म्हणून उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांना पसंती दिली असून वाघमारे यांची नियुक्ती करावी अशी मागणी काडादी यांनी जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडे केल्याचे समजले.

भारत वाघमारे यांच्या नियुक्तीला जिल्हाधिकार्‍यांनी अद्याप हिरवा कंदील दाखवला नाही अथवा वाघमारे यांनी ही आपला होकार कळवला नाही मात्र येत्या काही दिवसात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करायची हे जिल्हाधिकारी ठरवतील. सिद्धेश्वर कारखान्याचे 51 हजार सभासद मतदार आहेत यापूर्वी जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी सोलापूर जनता सहकारी बँकेची निवडणूक कोणत्याही महसूलचा एक ही कर्मचारी न घेता यशस्वीपणे पार पाडली होती. त्यामध्ये 56 हजार सभासद होते याचा विचार करता जिल्हाधिकारी आता निवडणूक उपनिबंधकाकडे देतात की भारत वाघमारे यांच्याकडे याकडे लक्ष लागले आहे.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग : बिबट्याने पंढरपूर भागात जर्सी गायीचा गळा घोटला

Next Post

महेश कोठे, तीनदा निवडणूक हरलात, लोकांचा विश्वास संपादन करता आला नाही राव

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

महेश कोठे, तीनदा निवडणूक हरलात, लोकांचा विश्वास संपादन करता आला नाही राव

ताज्या बातम्या

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979026
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group