सोलापूरात : प्रभाग 15 च्या नगरसेविका वैष्णवी करगुळे यांच्या प्रयत्नातून कुमार चौक, चाँदनी चौक काडादी चाळ, रेल्वे लाईन, कोनापुरे चाळ, तुराट गल्ली, न्यु तिऱ्हेगाव फाॅरेष्ट या भागातील नागरिकांच्या घरात मागील खुप वर्षापासून ड्रेनेजच्या पाण्याची समस्या सोलापूर महानगरपालिका आयुक्त व विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांची बैठक लावून ही समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासन नगरोत्यान योजना अंतर्गत 11कोटी 37 लाख रूपये रेल्वे क्रासिग करून ड्रेनेजच व पाऊसाचे पाणी पाईप लाईनचे काम हाती घेतल्याबद्दल व पाठपुरावा केला ते कामाचे लोकापर्ण आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीवर पुन्हा हल्लाबोल केला. भारतीय जनता पार्टी सत्ता मिळाल्यामुळे मग्रूर झाली आहे, शेतकर्यांच्या अंगावर गाड्या घालू, शेतकऱ्यांना चिरडू, कुणालाही अटक करू ही मग्रुरी झाली पंतप्रधानांची मग्रुरी ही इथल्या भाजीपाल्यामध्ये ही दिसून येते त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांची मग्रुरी घालवा असे आवाहन आमदार शिंदे यांनी केले.
.

















