सोलापूर जिल्हा परिषद सदस्य त्रिभुवन धाइंजे यांनी सोलापुर अंतर्गत महीला व बालविकास विभागाच्या कोटयवधी रुपयांच्या पोषण आहार घोटाळा उघड केला आहे. सुरुवातीला हे प्रकरण राष्ट्रवादीचे सदस्य उमेश पाटील आणि त्रिभुवन धाईंजे यांनी लावून धरले होते नंतर उमेश पाटील यांनी या विषयावर भाष्य करणे का? सोडून दिले, तो प्रश्न संपूर्ण झेडपीला पडला आहे मात्र पुढे हे प्रकरण धाइंजे यांनी लावून धरले आहे, यामध्ये महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
तसेच संबंधित पोषण आहाराचा ठेका घेणारे महीला साहसचे प्रितम शहा हे धाइंजे यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या त्याच्याकडे असलेल्या रिवॉल्वरची भिती दाखवत तसेच पैशाचे जिवावर मला जिवे मारण्याची धमक्या देत असल्याचा धाइंजे यांचा आरोप आहे.
जिल्हा परिषद स्थायी समिती, सर्वसाधारण सभा यामध्ये आवाज उठवला आहे, प्रकरणाची चौकशी समिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी नेमली, समितीचा अहवाल अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी त्रिभुवन धाइंजे यांच्याकडे सुपूर्द केला मात्र त्यावर ते समाधानी नाहीत.त्यांनी जावेद शेख आणि मक्तेदार यांच्याविरोधात आपली मोहीम सुरू ठेवली आहे. अँटीकरप्शन मध्ये ते गुन्हा दाखल करणार आहेत.
दरम्यान 25 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा झाली या सभेत महिला व बालकल्याण पोषण आहार घोटाळ्याचा कोणताही विषय निघाला नाही शुक्रवारी धाइंजे हे झेडपीत आले असता पत्रकारांनी त्यांना विचारले असता माझा लढा सुरूच आहे, लवकरच याविषयी गुन्हा दाखल करणार असून दिवाळीनंतर न्यायालयात खाजगी फिर्याद देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

















