दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव शिवारातील ब्रह्मनाथ मंदिर लगत असलेल्या पाझर तलावातून उघडपणे दगड खाण व खडी क्रशरचा मालक पाण्याची चोरी करत असूनही त्याच्यावर कारवाई करण्यास लघुपाटबंधारे विभाग धजावत आहे.
कासेगाव आणि गंगेवाडी परिसरात अनेक दगड खाणी आहेत या दगडखाणी मुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना प्रचंड त्रास असतानाही दगडखाणी चालकांच्या दहशतीला घाबरून शेतकरी बोलत नाहीत. कासेगावच्या शिवारात ब्रम्हनाथ मंदिरालगत एक पाझर तलाव आहे या तलावात पाणी साठल्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होतो.
मात्र या तलावाचे पाणी बाजूला असलेल्या “अभय स्टोन क्रशर” यादगडखाणीत उघडपणे चोरून नेले जात असल्याचे समोर आले आहे. पाणी चोरीचा प्रकार पाहिल्यास निश्चीतच प्रत्येकाला धक्का बसेल. तलावाचा नैसर्गिक सांडवा फोडून तलावाच्या आतून मोठी जेसीबीने चर मारून ते पाणी लांब पर्यंत आपल्या दगडखाणी मध्ये चोरून नेले जात आहे. हा प्रकार उघडपणे सुरू आहे.
हा तलाव जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाचा असल्याने या तालुक्यातील जलसंधारण विभागाचे अभियंता डोळेझाक करत असल्याचं आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडून बोललं जात आहे. हा दगडखाण चालक मोठा राजकीय व्यक्ती असल्याने त्याच्या विरोधात बोलण्याची डेरिंग कुणाचीही नाही. आपल्याकडे असलेल्या राजकीय पदाचा गैरवापर अशा पाणीचोरी मध्ये या दगड खाणचा मालक करत आहे.
गावातील शेतकऱ्यांनी दबक्या आवाजात ही माहिती जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाकडे दिली आहे परंतु अद्याप ही कोणतीही कारवाई झालेली नाही. पाणी पाइपलाइनद्वारे न घेता थेट तलावातच जेसीबीने मोठी चर मारून लाखो लिटर पाणी चोरले जातेय हा गंभीर प्रकार असल्याने आता जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभाग यावर कारवाई करण्याची डेरिंग करणार का? असा प्रश्न परिसरातील शेतकर्यांना पडला आहे.
दरम्यान कशाप्रकारे पाणी चोरी होत आहे पहा ऑन द स्पॉट व्हिडीओ👇👇👇

















