सोलापूर : पंढरपूरात दिनांक 5 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान कार्तिकी वारी होणार आहे .जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष मिलिंद शंभरकर यांनी आदेश काढून परवानगी दिली आहे.
कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्यानंतर मंदिरे उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. सुरवातीला दर्शनासाठी भाविकांची मर्यादा घालण्यात आली होती. परंतु, आता ते निर्बंध उठविले असून दररोज येईल त्याला रांगेतून श्री विठ्ठलाचे दर्शन घेता येईल, अशी सोय करण्यात आली आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग या नियमांचे पालन करणे सर्व भाविकांसाठी क्रमप्राप्त आहे.
दरम्यान जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कार्तिकी वारी निमित्त केलेले नियोजन आणि दिलेली जबाबदारी यांचे आदेश पहा

















