Monday, May 4, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : अमोल बापूंच्या फराळात ‘महाविकास आघाडी’ची चर्चा ; राष्ट्रवादीच्या ‘मेजॉरीटी’त काँग्रेस ‘एकाकी’

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
7 November 2021
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर (प्रशांत कटारे) : सोलापूर महापालिकेचे विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी आपल्या निवासस्थानी दिवाळीच्या फराळाचे आयोजन केले होते. शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अमोल बापूंच्या फराळाला सर्व पक्षीय नेत्यांनी हजेरी लावली. राष्ट्रवादी काँग्रेस कडून जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, प्रदेश उपाध्यक्ष विद्या लोलगे, शहर अध्यक्ष भारत जाधव, माजी महापौर महेश कोठे, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, यु एन बेरिया, दिलीप कोल्हे, नगरसेवक प्रथमेश कोठे जुबेर बागवान, प्रशांत बाबर, बालाजी पवार, आनंद मुस्तारे, महेश निकम्बे  ही प्रमुख नेतेमंडळी उपस्थित होती. 



शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, शहर प्रमुख गुरुशांत धूत्तरगावकर यांची उपस्थिती होती. काँग्रेस कडून गटनेते चेतन नरोटे, संजय शिंदे सागर शहा यांनी  हजेरी लावली. भाजप तर्फे सभागृह नेते शिवानंद पाटील, नगरसेवक संजय कोळी हे उपस्थित होते. माध्यम क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. मनोहर सपाटे यांची मात्र कमतरता जाणवली, 


अमोल शिंदे यांनी फराळ कार्यक्रमाचे अतिशय नेटके नियोजन केले होते. स्वतः बापू हे सगळीकडे लक्ष ठेवून होते, विचारपूस करत होते. अमोल बापूनी आपले राजकीय विरोधक पद्माकर काळे व भाजपचे बिज्जू अण्णा प्रधाने यांचे विशेष आदरातिथ्य केले.


बापूंच्या कार्यालयात कोठे, खरटमल, लोलगे, नरोटे, काका साठे, जुबेर बागवान एकत्र होते, या सर्वात काँग्रेसचे नरोटे एकटे होते, नरोटे हे महेश कोठे यांच्या कानात बोलत असताना माध्यम प्रतिनिधीनी फोटो काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा नरोटे चिडून फोटो काढू नका नुसती चर्चा करत आहोत असे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर एकटेपणा स्पष्ट दिसला, यावेळी आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागतील यांची चर्चा करत असताना काँग्रेसचे चेतन नरोटे यांनी आपण महाविकास आघाडी एकत्र आल्यास भाजपचा पराभव करू शकतो असे सांगितले तेव्हा कोठे यांनी पण होकार देत अजूनही सोलापूरात भाजपच नंबर वन आहे, म्हणूनच आपण एकत्र यायला हवे असे सांगितले. याचवेळी सुधीर बॉस यांनी पुन्हा आपली आमदारांच्या वरची नाराजी बोलून दाखवली, 

मागच्या निवडणुकीत आपण एकत्र लढण्याचे नियोजन केले मात्र तुमच्या ताईंनी आघाडी तोडली, आता तरी सांगा आघाडीत यायला असे म्हणून नरोटे यांच्याकडे निशाना केला. यानंतर विधान परिषद निवडणूक होणे शक्य नसल्याचे कोठे म्हणाले, त्यावर नरोटे यांनी सर्वांनी देव पाण्यात घातले आहेत अण्णा…,असे म्हणतात एकच हशा पिकला.

12 डिसेंबर हा शरद पवार यांचा वाढदिवस. त्यादिवशी साहेबांच्या सत्काराचा कार्यक्रम सोलापूरात ठेवायचा का? असे लोलगे म्हणाल्या, कोठे यांनी त्यादिवशी साहेब येणे शक्य वाटत नाही असे सांगितले. याच वेळी सेनेचे पुरुषोत्तम बरडे व गुरुशांत धुत्तरगावकर यांचे आगमन झाले, त्यामुळे एकटे पडलेल्या नरोटे यांच्या चेहऱ्यावर काहीसा ‘आनंद’ दिसला. बरडे आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने जास्त चर्चा न करता बाहेर पडणे पसंद केले. 

नंतर बरडे यांनी जुबेर बागवान यांची खेचली ते म्हणाले, जेवण व नाश्त्याला सर्व मिळून बाहेर पडता का?काका तर वडाळ्यावरून येतात असे म्हणतात बागवान यांनी साहेब म्हणूनच पक्ष मोठा दिसतो असे उत्तर दिले. दिलीप भाऊ कोल्हे यांचे उशिरा आगमन झाले, भाऊ नंतर भाजपच्या शिवानंद पाटील यांच्यासोबत नाश्त्याला बसले. या कार्यक्रमात भाजपचे सुद्धा अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये येणार असल्याची चर्चा ऐकण्यास मिळाली.

SendShareTweetSend
Previous Post

मोठी बातमी : कार्तिकी वारी ; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आदेश

Next Post

सोलापूर :’राष्ट्रवादी’च्या वाटेवरील दोन ‘भाचे’ मामांच्या भेटीला ; असा केला सत्कार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर :'राष्ट्रवादी'च्या वाटेवरील दोन 'भाचे' मामांच्या भेटीला ; असा केला सत्कार

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979049
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group