सोलापूर : काँग्रेसमधील युवक काँग्रेसच्या निवडणुका लागल्या आहेत, सोलापुरात शहर युवक काँग्रेस अध्यक्षपदासाठी राजकारण पेटले असून इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे ही निवडणूक गटबाजीवर गेल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर प्रदेश कार्याध्यक्ष तथा सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे या सोलापूर मध्ये असून त्यांच्या निवासस्थानी इच्छूक कार्यकर्त्यांनी भेटी घेतल्या आहेत.
इच्छुकांची संख्या वाढल्याने आमदारांचा समोर ही प्रश्नचिन्ह उभा असून 20 नोव्हेंबर पर्यंत जो उमेदवार सर्वाधिक मतदान घेईल त्यालाच अध्यक्ष म्हणून घोषित करून पुढे मतदान करण्याच्या सूचना आमदार प्रणिती शिंदे करणार आहेत. दरम्यान याबाबत विद्यमान युवक अध्यक्ष अंबादास करगुळे यांनी अधिक माहिती देताना काही नेते उंटावर बसून शेळ्या राखत आहेत, पदे मिळून सुद्धा ते पक्षासाठी काही करत नाहीत असे म्हणून त्यांनी आपला निशाना साधला पहा काय म्हणाले करगुळे….👇👇👇

















