सोलापूर : माढा तालुक्यातील रिधोरे येथे बार्शी- कुर्डुवाडी रस्त्यावर भाजप आमदार प्रशांत परिचारक यांच्या गाडीवर काळे ऑइल टाकून निषेध नोंदवण्यात आला.
मंगळवारी आमदार प्रशांत परिचारक हे अरे तो रे भागातून जात असताना त्यांच्या गाडीसमोर एका युवकाने आपली सायकल आडवी पाडली, त्यानंतर तो एका ठिकाणी गेला तिथून काळे ऑइल बाटली मध्ये आणले आणि ते आमदार परिचारक यांच्या गाडीच्या समोरील काचांवर फेकून भारत माता की जय अशी घोषणाबाजी केली…
मेजर बापू गायकवाड असे त्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी प्रशांत परिचारक यांच्या चारचाकी वाहनावर हे काळे तेल फेकले असून जवानांच्या पत्नींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा निषेध म्हणून ही कृती करण्यात आलीय.आगामी विधानपरिषद निवडणुकीत आमदार प्रशांत परिचारक हे भाजपचे संभाव्य उमेदवार आहेत.त्यामुळं जवानांच्या पत्नीबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या त्या वक्तव्याचा वाद पुन्हा नव्याने समोर आल्याचं आजच्या घटनेवरून दिसून आलं.


















