Friday, September 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून दंगलीचे राजकारण ; काँग्रेसच्या या नेत्याचा गंभीर आरोप

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
13 November 2021
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : त्रिपुरात घडलेल्या घटनेचे पडसाद म्हणून महाराष्ट्र अमरावती, नांदेड, मालेगावसह काही भागात वातावरण पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यात विधानसभेच्या 

निवडणुका लवकरच होत आहे. दंगली पेटवून निवडणुकीत त्याचा फायदा घेण्याचा भाजपाचा नेहमीप्रमाणे डाव आहे. म्हणूनच त्रिपुरा घटनेच्या आडून महाराष्ट्रात दंगली पेटवून त्यावर उत्तर प्रदेशात आपली राजकीय पोळी भाजण्याचे भारतीय जनता पक्षाचे षडयंत्र असून या षडयंत्राला राज्यातील जनतेने बळी पडू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये शांतता राखावी, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

काल आणि आज अमरावतीसह काही भागात घडलेल्या हिंसक घटनांचा तीव्र निषेध करून नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांचे सरकार दोन वर्षापासून स्थिर असून भाजपाने हे सरकार अस्थिर करण्यासाठी खूप प्रयत्न केले पण यात त्यांना यश आले नाही. महाराष्ट्रात अशांतता पसरवून सरकार पाडण्याचे सर्व प्रकारचे उद्योग झाले त्यात महागाई, बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, चीनची घुसखोरी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून देशभर भारतीय जनता पक्षाच्याविरोधात तीव्र असंतोष आहे. या मुख्य मुद्यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाकडून असे षडयंत्र केले जात आहे. हिंसक कारवाया करणे व अफवा पसरवणाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी.

समाजातील दोन घटकांमध्ये तेढ निर्माण करुन त्यावर आपली राजकीय पोळी भाजण्याचे राजकारण करणे हा भारतीय जनता पक्षाचा इतिहास राहिला आहे. देशातील ज्वलंत प्रश्नावर जनतेच्या आक्राशोला त्यांना तोंड देता येत नाही. तर जनतेमध्ये भाजपा व मोदी सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे. या असंतोषाचा फटका उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील आगामी विधानसभेच्या निवडणुकीत बसू नये म्हणून दंगली पेटवून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा भाजपाचा डाव आहे. महाराष्ट्रातील जनतेने भारतीय जनता पक्षाचा हा कुटील हेतू ओळखून षडयंत्राला बळी पडे नये, राज्यात शांतता राखावी, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी केले आहे.

SendShareTweetSend
Previous Post

भाजपने थकीत जीएसटी रक्कम द्यावी, मग इंधनावरील कर कपातीची भाषा करावी : चेतन चव्हाण

Next Post

Solapur : कोठे-सपाटेंनी एकमेकाला भरवला फराळ ; मात्र कोठे यांच्या बॅनरचीच सर्वत्र चर्चा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

Solapur : कोठे-सपाटेंनी एकमेकाला भरवला फराळ ; मात्र कोठे यांच्या बॅनरचीच सर्वत्र चर्चा

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000940
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group