Friday, September 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

Solapur : कोठे-सपाटेंनी एकमेकाला भरवला फराळ ; मात्र कोठे यांच्या बॅनरचीच सर्वत्र चर्चा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
13 November 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे महेश कोठे यांच्या निवासस्थानी भोजन करून गेले त्यांनी व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महेश कोठे यांच्यावर महापालिकेची सर्वस्व जबाबदारी दिल्याने कोठे यांचे राजकीय वजन  वाढल्याचे चित्र पाहायला मिळते.

 त्यामुळे काँग्रेस, भाजप, शिवसेनेचे महानगरपालिकेसाठी इच्छुक असलेले कार्यकर्ते महेश कोठे यांच्या संपर्कात आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या नंतर महेश कोठे यांनी दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन आपला बालेकिल्ला असलेल्या विडी घरकुल परिसरातील संभाजीराव शिंदे प्रशालेमध्ये शनिवारी केले होते. 

सायंकाळी सहा ते रात्री नऊ दरम्यान हा फराळाचा कार्यक्रम होता मात्र ही वेळ जेवणाची असली तरी महेशअण्णा यांचा फराळ असल्याने परिसरातील नागरिक, कार्यकर्ते आणि नेत्यांनी उपस्थिती लावली. महेश अण्णा यांचे सध्याचे राजकीय वजन पाहता सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची  निश्चित गर्दी होणार हे निश्चित होते त्या पद्धतीने फराळ कार्यक्रमाला गर्दी झाली. सुधीर खरटमल यांचा हात धरून राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ बांधलेल्या चंदेले मॅडम सर्वात प्रथम आल्या, त्यांच्या सोबत माझी  नगरसेविका बिस्मिल्ला शिकलकर माधुरी कांबळे हे कार्यकर्ते होते, 

माजी महापौर मनोहर सपाटे, काँग्रेसचे नेते चेतन नरोटे, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे हे एकत्र आले. फराळ खाताना महेश कोठे यांनी मनोहर सपाटे यांना फराळ भरवला, सपाटे हे सुद्धा गप्प बसले नाहीत त्यांनीही कोठे यांचे तोंड गोड केले. (भले ते एकमेकांना मनात काहीही म्हणत असतील) त्याच वेळी अमोल बापू यांचेही सपाटे साहेबांनी तोंड गोड केले.

 दिलीप भाऊंची उशिरा एन्ट्री झाली. नंतर कार्याध्यक्ष संतोष पवार, नगरसेवक आनंद चंदनशिवे, नगरसेवक तोफिक शेख, गटनेते किसन जाधव यांच्यासह अनेक नेत्यांची एकत्रित या कार्यक्रमाला इंट्री झाली. या  स्नेहमिलन कार्यक्रमामध्ये महेश कोठे यांनी तयार केलेल्या बॅनरची सर्वत्र चर्चा ऐकण्यास मिळाली हा बॅनर महेश कोठे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या अनुषंगाने बनवला होता. कोठे यांचे शरद पवार प्रेम या बॅनर मधून दिसून दिले. मात्र त्यांनी आपले पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याबाबत दुजाभाव केल्याचं दिसून आलं. 

सुरुवातीला सुप्रिया सुळे, दुसऱ्या क्रमांकावर मोठ्या स्वरूपात शरद पवार त्याच्यापेक्षा लहान फोटोत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील त्यानंतर जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे फोटो या बॅनर होते. सुशीलकुमार शिंदे यांच्याबाबत या बॅनरवर स्पष्टपणे दुजाभाव दिसत होता. जयंत पाटील आणि पालकमंत्री भरणे यांच्यामध्ये तेही ऐनवेळी बसवलेल्या स्वरूपात शिंदे साहेबांचा फोटो होता. 

शिंदे साहेबांपेक्षा मोठे फोटो नगरसेवक देवेंद्र कोठे आणि नगरसेवक प्रथमेश कोठे  यांचे होते. महेश कोठे यांनी कोणत्या उद्देशाने हा बॅनर केला की जाणीवपूर्वक असे केले का? याची कार्यक्रम स्थळी चर्चा होती. नगरसेवक देवेंद्र कोठे यांची या कार्यक्रमाला दांडी दिसून आली त्यांच्या सासूबाई महापौर श्रीकांचना यन्नम या मात्र आवर्जून उपस्थित होत्या. नगरसेवक प्रथमेश कोठे, रियाज मोमीन, वासुदेव इप्पलपल्ली यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

SendShareTweetSend
Previous Post

उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून दंगलीचे राजकारण ; काँग्रेसच्या या नेत्याचा गंभीर आरोप

Next Post

ब्रेकींग ! झेडपी : बसवेश्वर स्वामी व सुहास चेळेकर यांना अखेर जामीन मंजूर

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग ! झेडपी : बसवेश्वर स्वामी व सुहास चेळेकर यांना अखेर जामीन मंजूर

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000940
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group