सोलापूर, : एसटी महामंडळाच्या कार्यालयात विभाग नियंत्रकाला दमदाटी केल्याबद्दल भाजपच्या जिल्हाध्यक्षांसह सहाजणांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एसटीचे विभाग नियंत्रक विलास विठ्ठल राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, गणेश भोसले, नितीन करजोळे, गीता पाटोळे, धनश्री खटके, सविता कस्तुरे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
फिर्यादी राठोड हे शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास एसटी महामंडळाच्या कार्यालयात काम करीत असताना देशमुख यांच्यासह सहाजण कार्यालयात आले. त्यांनी फिर्यादीस तुम्ही एसटी चालक-वाहकांच्या संपात सहभागी का होत नाही, अशी विचारणा केली. त्यावेळी फिर्यादीने त्यांना शासनाकडून एसटी महामंडळ बंद ठेवण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या नाहीत.
संपामुळे नागरिकांना त्रास होत आहे असे सांगत चालक-वाहक यांना का जा म्हणून जबरदस्ती का तसेच कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे न घेतल्यास तुम्ही कसे काम करता तेच बघतो, असे म्हणून फिर्यादीस तेथून जाण्यास अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावेळी आरोपींच्या तोंडावर मास्क नव्हता तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पोळ हे करीत आहेत.
















