सोलापूर : सोलापूरची क्राईम पत्रकारिता ज्या माणसाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही असे नाव आहे इक्बाल शेख. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव इथं राहणारे आणि एका हाताने व्यंग असनारे इक्बाल शेख हे नाव जुन्या पत्रकारांसह पोलीस प्रशासनाला चांगलेच परिचित आहे.
सुमारे पंचवीस वर्षे ते कासेगाव हून सोलापूर शहरात एक हात नसतानाही सायकल प्रवास करून पत्रकारिता करत होते. क्राईम पत्रकारितेमध्ये थेट घटनास्थळी जाऊन बातमी करणारे ते पत्रकार होते. अभ्यासपूर्ण बातमी, वाचनीय बातमी, असे लेखन त्यांचे आहे. अनेक वंचितांना त्यांनी आपल्या लेखणीद्वारे न्याय मिळवून दिला आहे.
केवळ बातमीदारीच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या माहितीसह महाभारत, रामायण, कुराण याचा दांडगा अभ्यास त्यांना आहे. नव्या पिढीतील पत्रकारांना ते मार्गदर्शक ठरतात, इक्बाल शेख यांचा शहरातील लोकप्रधान या वृत्तवाहिनीने नुकताच सन्मान केला, तो सन्मान पाहून निश्चितच तीस वर्षाच्या पत्रकारितेचा हा सन्मान झाला असे वाटते. सोलापूरच्या पत्रकारितेमध्ये इक्बाल शेख यांच्या सारखे दुर्लक्षित अनेक पत्रकार आहेत, जे सन्मानाचे हक्कदार आहेत.
















