Thursday, November 12, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

दिलीप स्वामी : नव्या संकल्पना, नाविन्यपूर्ण उपक्रमांचा शिल्पकार ; यशस्वी वर्षपूर्ती : स्पेशल रिपोर्ट

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
14 November 2021
in solapur
0
0
SHARES
21
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

 


 

सोलापूर ! प्रशांत कटारे : एका आयएएस  अधिकाऱ्यांने मनावर घेतले तर काय होऊ शकत नाही, निश्चितच ग्रामीण भागाचा कायापालट होऊ शकतो. विविध संकल्पना, नवनव्या योजना, नाविन्यपूर्ण उपक्रम, हे सुचणे ते यशस्वीरित्या राबवणे,त्यात लोकसहभाग घेणे, राज्यसरकारने तो पॅटर्न स्वीकारणे, हे काही सोपे काम नाही.  त्याला तितकीच मेहनत, तेवढाच पाठपुरावा, तेवढीच जिद्द आवश्यक असते, अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांचा शिलेदार कोण? असा जर प्रश्न पडला तर एकच नाव समोर येईल ते म्हणजे सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचंच. ते मनमिळाऊ आहेत, ते कुटुंब वत्सल आहेत,  साधारण राहणी आणि उच्च विचारसरणी अशी त्यांची ख्याती असून सोलापूरच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये वेगळी छाप त्यांनी पाडली आहे.

दिलीप स्वामी यांनी 11 नोव्हेंबर 2020 मध्ये सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला, त्यानंतर माझे गाव, कोरोना मुक्त गाव, माझे दुकान माझी जबाबदारी, माझे मुल माझी जबाबदारी, माझी शाळा माझी जबाबदारी, गाव तेथे कोविड सेंटर, विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन निबंध स्पर्धा, स्वच्छ व सुंदर शाळा,  अधिकार्‍यांची गावात प्रभात फेरी, अधिकाऱ्यांचा गाव भेट दौरा असे विविध उपक्रम सोलापूर जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी राबवले

माझे गाव कोरोनामुक्त गाव हा तर उपक्रम राज्य सरकारने स्वीकारला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या उपक्रमाचे कौतूक करत सीईओ दिलीप स्वामी यांचा आपल्या फेसबुक पेजवर विशेष उल्लेख केला आहे. स्वच्छ व सुंदर शाळा हा उपक्रम ही राज्यात राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला. कोरोनाची दुसरी लाट युवा वर्गासाठी भयानक होती. कोरोना झाल्याने घाबरून मरणाऱ्यांची संख्या वाढली ती भीती आणि कोरोनाची दहशत मनामधून आणि डोक्यामधून घालवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी तालुकास्तरावरील कोविड सेंटर मधील रुग्णांसाठी ताणतणाव मुक्त व्यवस्थापन कार्यशाळा घेत स्वतः मार्गदर्शन केले, एवढंच नाही तर योग आणि प्राणायामाच्या माध्यमातून कोरोना मुक्तिचे धडे तेसुद्धा कोविड सेंटर मध्येच रुग्णांना दिलेत. या उपक्रमांचा खूप मोठा फायदा कोरोना रुग्णांना झाल्याचं पहायला मिळालं.

कोरोनाची दुसरी लाट ओसरते नाही तोच तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आणि ही तिसरी लाट बालकांसाठी धोकादायक असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. भविष्याचा विचार करून दिलीप स्वामी यांनी ग्रामीण भागातील अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेतील सुमारे नऊ लाख बालकांच्या आरोग्य तपासणीची मोहीम हाती घेतली. यामध्ये पाच लाखाहून अधिक बालकांची आरोग्य तपासणी झाली आहे त्यात जवळपास साठ बालके कोरोणा पॉझिटिव तर सुमारे साडेसहाशे बालके ही कोरोना सदृष्य आजाराची आढळून आली मात्र वेळेवर उपचार झाल्याने एकाही बालकाच्या जीवाला धोका झाला नाही हे सोलापूर जिल्ह्यासाठी महत्वाचीच बाब म्हणावी लागेल.

सोलापूर जिल्ह्यातील तब्बल तीनशेहून अधिक गावे ही संपूर्ण महिनाभर कोरोनामुक्त राहिली आहेत महिनाभरात एक ही कोरोनाचा रुग्ण या गावांमध्ये मिळून आला नाही त्या गावांमध्ये शाळा सुरू करण्याची संकल्पना दिलीप स्वामी यांनी राज्य शासनाला समोर मांडली तसा प्रस्तावही पाठवला विशेष म्हणजे याची दखल संपूर्ण राज्यभरात घेण्यात आली, ज्या गावात एक महिनाभर एकही कोरोना रुग्ण नाही त्या गावात आठवी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला हे सोलापूर जिल्हा परिषद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्यासाठी गौरवाची बाब होती.

दिलीप स्वामी यांच्या  कोरोनामुक्त गाव या पॅटर्नची व स्वच्छ व सुंदर शाळा या उपक्रमाची दखल राज्य सरकारने तर घेतलीच आहे मात्र यशदा या प्रशासकीय संस्थेच्या यशमंथन मासिकात सोलापूरचा गाव कोरोनामुक्त पॅटर्न लक्षवेधी ठरला.

कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक अद्ययावत नसेल तर सेवा निवृत्ती नंतर कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्ती वेतन मंजूरीसाठी हेलपाटे मारावे लागतात. कर्मचार्‍यांची ही अडचण लक्षात घेऊन सीईओ स्वामी यांनी काही महिन्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व संवर्ग कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक अद्ययावत करण्याची मोहीम हाती घेतली होती. 

सर्व संवर्गातील 14000 कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक अद्ययावत झाल्यानंतर या सेवा पुस्तकांचे डिजिटायझेशन करून मोबाईल वर उपलब्ध करून दिल्यास सर्व कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने सोयीस्कर होईल अशी संकल्पना सीईओ स्वामी यांनी मांडली. त्यानुसार  दोन महिने ई सेवा पुस्तक मोबाईल ॲप तयार करण्याचे काम सुरू होते. त्या यशस्वी ॲप’चा दिनांक 1 नोव्हेंबर रोजी अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या हस्ते  शुभारंभ करण्यात आला. हा उपक्रम ही आता राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये राबविला जाणार आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सोलापूर जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे शाळा बंद होत्या मात्र त्यांनी आपल्या संकल्पनेतून झेडपीच्या शाळा स्वच्छ व सुंदर करण्याचा उपक्रम हाती घेतला. यात लोकसहभाग घेतल्याने या उपक्रमाला चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. लोकसहभागातून एक नाही दोन नाही तर तब्बल 6 कोटी रुपये जमा झाले त्यातून अडीच हजार शाळा स्वच्छ व सुंदर करण्यात आल्या आहेत. शाळेचे हे रुपडे पाहून विद्यार्थ्यांसह पालकांनी सुध्दा तोंडात बोटे घातली आहेत. हा उपक्रम इतका चर्चेचा झाला की,याची राज्यस्तरावर नोंद घेण्यात आली आहे. आता राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर झेडपी सीईओ दिलीप स्वामी यांना प्रेझेन्टेशन देण्यासाठी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी निमंत्रण दिले आहे.

गेली कित्येक दिवसांपासून ज्या मुख्याध्यापक पदोन्नतीची प्रतिक्षा होती ती गुरुवार 16 सप्टेंबर रोजी अगदी सुरळीतपणे पार पडली. कोणाचीही काहीही तक्रार नाही, गोंधळ नाही, हसत खेळत ही प्रक्रिया पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन समुपदेशन पध्दतीने पार पडली. दिव्यांग, अस्थिव्यंग व इतर अशा 200 उपशिक्षकांची मुख्याध्यापक पदी पदोन्नती करून समुपदेशन पध्दतीने पदस्थापना देण्यात आली. यामध्ये एकुण 56 दिव्यांग शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ देण्यात आला. 

एक पद, एक वृक्ष या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेतील सुमारे पंधरा हजार अधिकारी कर्मचारी तसेच जिल्ह्यातील सरपंच यांनी एकच झाड लावायचं आणि ते वर्षभर सांभाळायचे ही जबाबदारी सीईओ स्वामी यांनी वाटून दिली. दिलीप स्वामी यांचा हा उपक्रम  जिल्ह्यात एक प्रकारची चळवळ झाला. शहरातील राष्ट्रीयकृत बँकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवत शेकडो वृक्ष लावले आहेत, स्वामी यांचा हा उपक्रम महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी अंगीकारला.

आयएएस अधिकारी काय करू शकतो हे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे .त्यांनी केवळ एका वर्षात सोलापूर जिल्हा परिषदेला राज्यात एका उंचीवर नेऊन बसवले आहे. यापुढे त्यांना पदाधिकारी, सदस्य आणि विभाग प्रमुख तसेच सर्वच कर्मचाऱ्यांच्या सहकाऱ्यांची आवश्यकता आहे.

SendShareTweetSend
Previous Post

Solapur : राष्ट्रवादी युवक अध्यक्ष जुबेर बागवान आपल्या भावाला उतरविणार मैदानात ; सध्याच्या प्रभाग 14 मध्ये होणार ‘तगडी फाईट’

Next Post

दुःखद : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

दुःखद : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

ताज्या बातम्या

ब्रेकिंग ! मोहिते पाटील, शिंदे, माने, हसापुरे, पाटील, परिचारक, म्हेत्रे, आवताडे, बागल यांचे अर्ज बाद ; सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, धैर्यशील मोहिते पाटील, बाबासाहेब देशमुख यांचे अर्ज मंजूर

ब्रेकिंग ! मोहिते पाटील, शिंदे, माने, हसापुरे, पाटील, परिचारक, म्हेत्रे, आवताडे, बागल यांचे अर्ज बाद ; सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, धैर्यशील मोहिते पाटील, बाबासाहेब देशमुख यांचे अर्ज मंजूर

3 November 2026
सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

ब्रेकींग: बार्शी, मंगळवेढा, मोहोळ बिनविरोध? ; खासदार आमदारांसह हसापूरे यांचे शक्ती प्रदर्शन ; एक खासदार अन् सहा आमदारांची उमेदवारी

30 October 2026
सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

29 October 2026
सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

Our Visitor

2006865
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group