Friday, September 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

बार्शीच्या दोन ‘राजेंद्र’मध्ये वाद पेटला ; पोलीस ठाण्यात खेचले एकमेकांना

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 November 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी : बार्शी तालुक्यात यापूर्वी आमदार राजेंद्र राऊत विरोधात माजी मंत्री दिलीप सोपल असा वाद पाहायला मिळायचा मात्र आता बार्शी मधील दोन राजेंद्र मध्येच वाद उफाळून आला आहे विशेष म्हणजे एकाच भारतीय जनता पक्षाची संबंधित हे दोन्ही नेते मंडळी आहेत वाद इतका वाढलाय की एकमेकांविरोधात गुन्हा दाखल परत करण्यापर्यंत आता प्रकरण गेले आहे.

बार्शीतील नूतनीकरण केलेल्या भगवंत मैदानाच्या लोकार्पण कार्यक्रमास येत असताना आ. राजेंद्र राऊत यांच्या अंगावर रसायन टाकण्याचा प्रयत्न केल्याबद्दल प्रहार अपंग संघटनेच्या जिल्हाध्यक्षा संजीवनी बारंगुळे यांच्यासह बालाजी डोईफोडे, ओमकार पिंपळे, सतीश बारंगुळे व इतर दोन अनोळखी इसमांविरोधात शहर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत आ. राऊत यांचे खाजगी स्विय सहाय्यक प्रशांत चंद्रकांत खराडे यांनी फिर्याद दिली आहे. तसेच याप्रकरणात सहभागी संशयित अरोपी बालाजी डोईफोडे यांनी आपणांस आ. राऊत यांनी नगरपालिकेत बोलावले आहे असे सांगितल्यानंतर आपण  तेथे गेल्यानंतर नगरसेवक पाचू उघडे, नगरसेवक दिपक राऊत यांचे बंधू सतिश राऊत व अन्य पाच ते सहा अनोळखी इसमांनी लाथा-बुक्क्याने मारहाण केल्याची फिर्याद दिल्यावरुन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सदर प्रकरणाची शहरात उलटसुलट चर्चा रंगली आहे.  

याबाबत खराडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी दुपारी 4 वा. भगवंत मैदानाच्या नूतनीकरण कार्यक्रमासाठी ते आ. राऊत यांच्यासमवेत कार्यक्रम स्थळाकडे निघाले असता गेट नं. 1 च्या समोर संजीवनी बारंगुळे, बालाजी डोईफोडे, ओमकार पिंपळे, सतिश बारंगुळे व इतर दोन अनोळखी इसम यांनी त्यांना अडवले. तुम्ही आमचे नेते राजेंद्र मिरगणे यांच्या बांधकाम प्रकल्पाबाबत तक्रारी का करता, असे म्हणून संजीवनी बारंगुळे यांनी तिच्याजवळील बाटलीचे झाकण उघडून कसले तरी केमिकल त्यांच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला.  त्यांना धरुन बाजूला करताना बाटली जमिनीवर पडून त्यातील द्रव सांडले. 

यावेळी त्यांच्यासमवेत  असलेल्यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी जवळच असलेले संदेश काकडे, दिपक राऊत, पाचू उघडे, अमोल चव्हाण व इतर लोक जवळ येत असल्याचे पाहून आरोपी पळून जावू लागले. त्यावेळी ओमकार पिंपळे याला संदेश काकडे व दिपक राऊत यांनी पाठलाग करुन पकडले. त्यावेळी त्याच्या खिशात असलेल्या मोबाईलवर फोन आला. तो फोन दिपक राऊत यांनी उचलला. समोरुन मी राजेंद्र मिरगणे बोलतोय, तुम्ही अजून राजा राऊताच्या अंगावर ऍसिड टाकले का नाही, अशी विचारणा केली. 

त्यावरुन वरील प्रकार हा राजेंद्र मिरगणे यांचे सांगण्यावरुन घडला असून आ. राऊत यांनी मिरगणे यांच्या बेकायदेशीर बांधकामाबाबत तक्रारी केल्यामुळे चिडून जावून राजेंद्र मिरगणे यांनी आ. राऊत यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यासाठी संजीवनी बारंगुळे व इतरांना सुपारी दिली आहे, अशी खात्री झाली, असे म्हटले आहे. 

बालाजी डोईफोडे यांच्या फिर्यादीनुसार, ते दुपारी 3.50 वा. सुमारास घरी असताना सतिश राऊत व अनोळखी तिघेजण त्यांच्या घरी आले. व त्यांनी तुम्हांला आमदारसाहेबांनी नगरपालिकेमध्ये बोलाविले आहे, असे सांगितले. त्यामुळे ते त्यांच्यासोबत नगरपालिकेमध्ये गेले. तेथे नगरसेवक पाचू उघडे यांनी काटकर यास फोन लाव व त्यास नगरपालिकेत बोलावून घे, असे सांगितले. त्यामुळे त्यांनी काटकर याला फोन करुन सांगितले. त्यानंतर तेथे पवारसर आले व येथून तुम्ही बाहेर चला असे म्हणून नगरपालिकेच्या गेटवर आले. 

नंतर तेथे उभे असलेले पाचू उघडे, सतिश राऊत व अनोळखी पाच ते सहा जणांनी त्यांना काही न बोलता लाथाबुक्क्यांनी मारहाण करणेस सुरुवात केली. त्यावेळी रमेश पाटील, विश्वासभाऊ बारबोले, पवार सर तसेच तेथे बंदोबस्तासाठी आलेले पोलिस कर्मचारी यांनी त्यांना सोडविले,  असे फिर्यादीत म्हटले आहे. 

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग : सोलापूरात वर्ल्डकप टी-20 फायनलमध्ये सट्टा ; सहा जणांना अटक

Next Post

Solapur : भीषण अपघात : अक्कलकोटहून येणाऱ्या प्रवासी जीपचा टायर फुटला ; 5 ठार तर अनेक जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

Solapur : भीषण अपघात : अक्कलकोटहून येणाऱ्या प्रवासी जीपचा टायर फुटला ; 5 ठार तर अनेक जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000962
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group