आनंद युवराज लोणारी वय 28, राहणार अक्कलकोट शहर असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव असून आनंद हा अक्कलकोट मधील ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक होता. मयत आनंद लोणारी यांचा अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याशी कौटुंबिक संबंध असल्याची माहिती मिळाली. लोणारी हे आमदार कल्याणशेट्टी यांच्या मुलांना घरी येऊन ट्युशन देत होते, मंगळवारी एसटी नसल्याने लोणारी हे सुद्धा प्रवासी जीपने सोलापूरकडे येत होते, या अपघातात गंभीर जखमी झाल्याने सिव्हिल हॉस्पिटल मधून त्यांना अश्विनी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय आमदार कल्याणशेट्टी यांनी घेतल्याचे समजले.
मात्र उपचारा दरम्यान या युवा शिक्षकाचा मृत्यू झाला. या भीषण अपघातामुळे संपूर्ण अक्कलकोट तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यातील सर्व मयत हे सर्वसामान्य कुटुंबातील असून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे 6 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अवैध प्रवासी वाहतूक असल्याने याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
















