सोलापूर : सोलापूर शहराजवळ मंगळवारी सकाळी (ता.16 नोव्हेंबर ) अकराच्या सुमारास प्रवासी जीपचा भीषण अपघात झाला होता या अपघातानंतर अक्कलकोट तालुक्यातील ब्यागेहळ्ळी गावावर शोककळा पसरली असून अपघातातील तीन जण याच गावातील मयत झाले आहेत.
सकाळ पासून अपघातात मयत झालेल्या एका 32 वर्षीय महिलेची ओळख पटत नव्हती. त्या महिलेचे नाव सुनीता सुनिल महाडकर आहे ती महिला ही अक्कलकोट तालुक्यातील दोड्याळ गावची असून हे गाव ब्यागेहळ्ळी पासून केवळ 2 किमी अंतरावर आहे याच गावातील कट्ट्यावा यल्लप्पा बनसोडे वय 55, बसवराज यल्लप्पा बनसोडे वय 42, आनंद इर्राप्पा गायकवाड, वय 25 हे तिघे जागीच ठार झाले होते.
या अपघातानंतर जीप चालकाला पोलिसांनी अटक केली आहे जलील नजीर बागवान राहणार मेत्रे नगर अक्कलकोट असे चालकाचे नाव आहे.
या अपघातात अक्षय लक्ष्मण शिंदे वय 19 रा. बणजगोळ ता. अक्कलकोट 3 ) समर्थ प्रशांत अनंत वय 20 रा. फत्तेसिंह चौक अक्कलकोट 4 ) विशाल दगडू गोरसे वय 24 समता नगर अक्कलकोट 5) गुरुराज रविंद्र वांजरे वय 28 रा बुधवार पेठ अक्कलकोट 6) सैपन इब्राहिम वाडीकर वय 60 रा गौंडगाव ता. अक्कलकोट 7) रमाबाई यल्लप्पा बनसोडे वय 55 रा भिमनगर अक्कलकोट 8) विशाल यल्लप्पा बनसोडे वय 18 रा भिमनगर अक्कलकोट 9) निजाम हनिफ मुल्ला वय 28 रा. वाघदरी ता अक्कलकोट हे जखमी असुन ते सध्या उपचार घेत आहे.
















