सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक जुना आणि मोठा समजला जाणारा श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखाण्याच्या संचालक मंडळाची निवडणूक लागली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी दिली आहे.
सध्या कारखान्याला मल्टिस्टेट दर्जा आहे. 20 संचालकांचे मंडळ कारखान्यावर आहे. त्यामध्ये 15 संचालक हे ऊस उत्पादक गटातून 2 संचालक अनुसूचित जाती प्रवर्गातून, 2 संचालक महिला प्रवर्ग व 1 बिगर उत्पादक सहकारी संस्था अशा गटातून संचालक निवडून द्यायचे आहेत. 16 हजार सभासद मतदार असून प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील राजकारण्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी निवडणूक प्रक्रियेची अधिक माहिती दिली…👇👇👇
सध्या कारखान्याच्या बेकायदेशीर को-जनरेशनच्या चिमणीचा मुद्दा गाजत आहे. यामुळे कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी हे काहीसे अडचणीत आहेत. निवडणूक जाहीर होताच राज्याच्या नगरविकास खात्याने महानगरपालिका आयुक्त पी शिवशंकर यांना ही चिमणी पडण्याची कार्यवाही करावी असे आदेश पत्रात दिले आहेत. निवडणुकीची आचारसंहिता लागताच हा आदेश निघाल्याने निश्चितच याला आता सर्वपक्षीय विरोध होणे अपेक्षित आहे तसेच सध्या गाळप सुरू झाल्याने ही प्रखर विरोध होण्याची शक्यता आहे.
















