सोलापूर (प्रतिनिधी) भिम युवक क्रिडा मंडळ संचलित एस पी प्रतिष्ठान आयोजित सामुदायिक विवाह सोहळा कोरोना प्रतिबंधक नियमाचे पालन करून 26 डिसेंबर रोजी गोरज मुहूर्तावर भवानी पेठ मड्डी वस्ती सारनाथ बुध्द विहाराच्या मैदानात होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक समीर पांडगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यंदाचे विवाह सोहळ्याचे ०४ वर्ष असून आजवर प्रतिष्ठानच्यावतीने 29 जोडप्यांचे विवाह संपन्न झाले आहेत. यंदाचा विवाह सोहळा 26 डिसेंबर रोजी होणार असून विवाह सोहळ्यात सहभागी होणार्या वधू-वरास मनी मंगळसुत्र, बेड,राजाराणी कपाट विवाहाचे कपडे, जोडवे देण्यात येणार आहेत,भोजनाची व्यवस्था त्याशिवाय संसारोपयोगी साहित्यही देण्यात येणार असल्याचे समीर पांडगळे यांनी सांगितले. या विवाह सोहळ्यास सहभागी होवू इच्छिणार्यांच्या नातेवाईकांनी एस पी प्रतिष्ठान कार्यालयात नाव नोंदणी करण्यासाठी संपर्क साधावा, विवाह सोहळ्याच्या माहितीसाठी संपर्क 99221562420 ,9850281156 8421138979 9834642028 या नंबर शी संपर्क करावा असे अव्हान समीर पांडगळे यांनी केले
















