सोलापूर : मित्राच्या वाढदिवसानिमित्त सार्वजनिक ठिकाणी मंडप व स्टेज घालून कार्यक्रम केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सुरज ऊर्फ छोटु संजय गायकवाड २) शुभम संजय डूरे, ३) सोहेल अन्वर शेख ४) रशिद अब्दुल शेख ५) अमोल भारत सर्वगोड असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलीस नाईक अमोल भिमाशंकर कटके, जोडभावी पेठ, पोलीस ठाणे, यांनी फिर्याद दिली आहे.
शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास भवानी पेठ, जम्मा वस्ती येथील सिध्दार्थ चौक ते अंबिका चौक, विजय तरुण मंडळ समोर, सार्वजनिक रोडवर एका बाजुस स्टेज मारण्यात आला होता, गर्दी जमवून स्टेजच्या समोर खुर्च्या टाकुन धम्मपाल ऊर्फ धम्मा सर्वगोड याच्या वाढदिवस सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
संयोजकांनी महापालिका आयुक्तांच्या १३/०८/२०२१ अन्वये पारीत केलेल्या आदेशाचे उल्लंघन करुन गैरकायदयाची मंडळी जमवून सार्वजनिक रोडवर स्टेज मारुन रोडवर खुर्या टाकुन वाढदिवसाचे कार्यक्रमाचे आयोजन करून मानवी जिवाची सुरक्षितता धोक्यात येईल असे कृत्य केले.कोरोना संसर्ग पसरविण्याचे हयगयीचे कृत्य केले आहे म्हणून हा गुन्हा दाखल झाला.


















