सोलापूर : सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम नेते खासदार असदुद्दीन ओवेसी हे मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर येत असून हुतात्मा स्मृती मंदिरात कार्यकर्ता मेळावा होणार आहे. या मेळाव्याची एमआयएमने जोरदार तयारी केली आहे. दरम्यान शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांनी खासदार ओवेसी यांचा दौरा हा सोलापुरातील गद्दारांसाठी ट्रेलर असल्याचे सांगत आपला निशाणा साधला पहा काय म्हणाले शाब्दी…

















