सोलापूर : राज्य शासनाने मोहम्मद पैगंबर बिल मंजूर करावे, मुस्लिम समजाला न्यायालयाने मान्यता दिलेले आरक्षण लागू करण्यासाठी वंचीत बहुजन आघाडी तर्फे सोमवारी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.
सोलापूरात शहराध्यक्ष ऍड एच एच बडेखान जिल्हाध्यक्ष नानासाहेब कदम, प्रदेश उपाध्यक्ष राजरत्न फडतरे, यांच्या नेतृत्वाखाली आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना देण्यात आले.
मुस्लिम समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक मागासलेपणाबद्दल केंद्र व राज्य शासनाकडे विविध समित्यांचे आणि आयोगाचे अहवाल पडून आहेत. मात्र शासन मुस्लिम समाजाच्या विकासाबाबत कायमच उदासीन असल्याचे दिसून येते. न्यायालयाने मान्यता दिलेल्या ५% मुस्लिम शैक्षणिक आरक्षणाची शासन अंमलबजावणी करीत नाही यातच शासनाची अल्पसंख्याक विरोधी मानसिकता दिसून येते. धार्मिक भावना भडकावून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना कठोर शिक्षा देणारे ‘ मोहम्मद पैगंबर बिल’ वंचित बहुजन आघाडीने शासनाला सुपूर्द केले आहे, येणाऱ्या अधिवेशनात पैगंबर मोहम्मद बिल मंजूर करून तात्काळ तो कायदा लागू करावा.
महाराष्ट्र वक्फ बोर्डच्या मिळकती मध्ये वाढ करुन इमाम, व मुअज्जिन आणि खुद्दाम हज़रात यांना मासिक वेतन सुरू करण्यात यावे.
संत विचारांचा प्रचारप्रसार करण्याऱ्या ह.भ.प. कीर्तनकार यांना शासनाकडून मासिक वेतन सुरू करण्यात यावे.
वक्फ बोर्डाच्या जमीनीवर झालेले अवैध कब्जे हटवून त्या जागेचा अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी उपयोग करावा. या प्रमुख मागण्या वंचित बहुजन आघाडीच्या आहेत.
सारथी-बार्टी-महाज्योती प्रमाणे मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्थेची स्थापना करावी.

















