मोहोळ : तालुक्यातील मौजे पीर टाकळी गावातील महादेव वस्ती येथे सभामंडप व पिरटाकळी ते विरवडे रस्ता खडीकरण कामाचा शुभारंभ सोलापूर जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी विरवडे बुद्रुक येथील लोकशक्ती परिवाराचे नेते जयसिंग नाना अवताडे, कामती खुर्दचे आत्माराम राठोड, माजी सरपंच बंडू पाटील, माजी उपसरपंच विठ्ठल माळी,लोकशक्ती परिवारचे युवा नेते महेश धुमाळ, उपसरपंच गोकुळ थिटे, मुरलीधर थिटे, अंगद पाटील, तानाजी थिटे, गणेश थिटे, प्रभाकर थिटे, हणमंत थिटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान मोहोळ तालुक्याच्या विकासासाठी डोंगरे परिवार व लोकशक्ती परिवार कायम कटिबद्ध असल्याचे सभापती विजयराज डोंगरे यांनी सांगितले.


















