सोलापूर : सोलापुरात एमआयएम पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा झाला या मेळाव्याला पक्षाचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मार्गदर्शन केले त्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दा हा केवळ मुस्लिम आरक्षण होता या आरक्षण मागणीसाठी मुंबईमध्ये 11 डिसेंबर रोजी राज्यव्यापी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
ओवेसी यांच्या मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आडम मास्तर यांची भूमिका विचारली असता त्यांनी, हायकोर्टाने मुस्लिम आरक्षणाचा निकाल दिला तेव्हापासून आजपर्यंत ओवेसी झोपले होते का? आता महापालिका निवडणुका असल्याने आरक्षण आठवले का? असा प्रश्न उपस्थित करून ओवेसी यांच्यावर तोफ डागली काय म्हणाले आडम मास्तर पहा


















