Wednesday, September 30, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : ‘जनवात्सल्य’वर “चाय पे चर्चे”त रंगल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीच्या गप्पा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 November 2021
in solapur
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त सात रस्ता चौकातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र झाले होते. याच वेळी काँग्रेस पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष प्रकाश वाले हे सुद्धा अभिवादन करण्यासाठी त्या ठिकाणी आले. महाविकास आघाडीतील दोन्ही पक्ष एकत्रित आल्याने सर्वांनी मिळून अभिवादन केले. 

आमदार प्रणिती शिंदे यांचे निवासस्थान जनवात्सल्य हे बाजूलाच असल्याने त्यांनी सर्वांना चहाचे निमंत्रण दिले. आमदारांच्या निमंत्रणाला मान देऊन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, माजी महापौर मनोहर सपाटे, माजी शहराध्यक्ष महेश गादेकर, शफी इनामदार ही प्रमुख नेते मंडळी सर्व कार्यकर्त्यांसह आमदार ताईंच्या निवासस्थानी चहाला गेले त्याठिकाणी ‘चाय पे चर्चा’ मध्ये सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच गप्पा रंगल्या.

दोन्ही पक्ष आणि शिवसेना राज्यामध्ये सत्तेत असल्याने सोलापूर महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात तिने पक्षांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवण्यास निश्चितच आपण भारतीय जनता पार्टीला हरवू शकतो असा सूर कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव यांच्या तोंडून निघाला. मात्र काँग्रेस पक्षांने एकला चलो रे ची भूमिका स्पष्ट केल्याने आणि सत्ता मिळवण्याच्या वाटेने वाटचाल करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेने निवडणूकीत एकत्र येण्याची भाषा केवळ वरवरचीच होती का? असाही प्रश्न सर्वसामान्यांना पडणार आहे.

एकूणच महेश कोठे यांच्या ताब्यात सोलापूर शहराचा राष्ट्रवादी पक्ष गेल्याने पक्षांतर्गत धुसफूस कायम आहे. जरी पक्षाचे नेते शरद पवार व  उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी महेश कोठे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी नुकत्याच झालेल्या एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत ही धुसफूस बाहेर निघाली असल्याची माहिती समोर आली आहे आणि विशेष म्हणजे महेश कोठे यांना अजूनही पक्षांतर्गत विरोध असल्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून ‘दबक्या’ आवाजात ऐकण्यास मिळते.

SendShareTweetSend
Previous Post

महाविकास आघाडी सरकारने मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण द्यावे ; शरद पवारांसमोर जुबेर बागवान यांची मागणी

Next Post

सोलापूर : सिव्हीलच्या डीनचा ‘ठाकूरी’ कारभार ; आता सिव्हीलमध्ये वाहनांना बंदी?

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर : सिव्हीलच्या डीनचा 'ठाकूरी' कारभार ; आता सिव्हीलमध्ये वाहनांना बंदी?

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2001229
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group