सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार अमर साबळे यांनी सोलापुरात शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. महाविकास आघाडीच्या फसवणुकीचे 2 वर्ष असा पत्रकार परिषदेचा विषय होता.
यावेळी साबळे यांनी अनुसूचित जातीजमातींच्या समस्या सोडविण्याकरिता राज्यघटनेनुसार नियुक्त करावयाच्या आयोगाची नियुक्ती करण्यात ठाकरे सरकारने तब्बल दीड वर्षे दिरंगाई केल्याने या समाजाच्या समस्या टांगणीवर लागल्या आहेत. जनहिताच्या अनेक योजनांना टाळे लावणाऱ्या स्थगिती सरकारने या आयोगासही टाळे लावल्याने हजारो सुनावण्या झाल्याच नाहीत. मागासवर्गीय, अनुसूचित जातीजमातींच्या कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्याही दुर्लक्षित राहिल्याने कागदावर या आयोगाचे अस्तित्व आणून ठाकरे सरकारने अनुसूचित जाती जमातींची फसवणूक केली आहे, असा आरोप पत्रकार परिषदेत केला.
याचवेळी पत्रकारांनी सोलापूर लोकसभेचे खासदारांनी बोगस दाखला देऊन अनुसूचित जातीच्या मूळ लाभार्थ्यांवर हा अन्याय नाही का? असा प्रश्न उपस्थित केला असता काही वेळ अमर साबळे यांना बोलता आले नाही, ते हसत हसत म्हणाले, तो न्यायालयाचा विषय आहे मी बोलू शकत नाही असे उत्तर दिले मात्र पत्रकारांनी हा तुमच्यावरही अन्याय होता, तुम्ही इच्छुक होतो, निवडणूक झाली तुम्ही गायब झालात परत दिसले नाहीत? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. पहा काय घडले हा व्हिडीओ…

















