सोलापूर : एमआयएमचे नगरसेवक तोफिक शेख यांनी आपल्या ताज सोशल ग्रुपच्या वतीने गुरुवारी हेरिटेज लॉन मध्ये जातीय सलोखा कार्यक्रमांतर्गत सोलापूर शहरातील विविध क्षेत्रातील covid योद्धयांचा सन्मान कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमाला मौलाना इब्राहिम, माजी महापौर आरिफ शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, नगरसेवक मनोज शेजवाळ, माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड, नगरसेविका नूतन गायकवाड, नगरसेविका पूनम बनसोडे, नगरसेविका वाहिदाबी शेख, शिवसेनेचे प्रताप चव्हाण, नगरसेवक प्रवीण निकाळजे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, महापालिका उपायुक्त धनराज पांडे, उद्योजक केतन वोरा, राजू कुरेशी, इरफान शेख, अदनान शेख, अजमल शेख यांच्यासह विविध समाजातील मान्यवरांची उपस्थिती होती.
तौफिक शेख यांच्या कार्यक्रमाचे धर्मगुरूंनी कौतुक केले. आपल्या भाषणात तौफिक पैलवानांनी कार्यक्रमामागील उद्देश सांगितला, ही सर्व मान्यवर मंडळी गौरवाचे हक्कदार आहेत असे सांगत त्यांनी मूळ मुद्द्यावर येत राजकीय भाष्य केले.
ज्याचे काम आहे, ज्याची ओळख आहे, जो सुखादुःखात येतो असा माणूस नगरसेवक होतोच, त्याला पैशाची गरज नाही, मात्र आज काही लोक 50 लाख, एक कोटी देतो अशा ऑफर आहेत, त्यांना सांगा आम्हाला गरज नाही अशा भाषेत विरोधकांना चिमटे काढले. ऐका काय म्हणाले तौफिक शेख

















